Shaktikanta Das Saam tv
देश विदेश

Shaktikanta Das : मोठी बातमी! माजी गर्व्हनर शक्तिकांत दास यांना PMOमध्ये महत्वाची जबाबदारी, वाचा

Shaktikanta Das Latest News : माजी गर्व्हनर शक्तिकांत दास यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शक्तिकांत दास यांची प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गर्व्हनर शक्तिकांत दास यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शक्तिकांत दास यांची नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून ६ वर्ष सेवा दिल्यानंतर शक्तिकांत दास हे डिसेंबर २०२४ रोजी निवृत्त झाले. तर पीके मिश्रा हे ११ सप्टेंबर २०१९ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव आहेत.

शक्तिकांत दास कोणती जबाबदारी सांभाळणार?

भारत सरकारने आर्थिक निती आणि प्रशासन मजबूत लक्ष केंद्रीत करण्यास ठरवलं आहे. त्यात आरबीआयचे माजी गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी कर, उद्योग इत्यादी क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध पदांवर काम केलं आहे. त्यामुळे शक्तिकांत दास यांनी प्रधान सचिव -२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता आर्थिक प्रकरणात महत्वाचा सल्ला देण्याची महत्वाची भूमिका शक्तिकांत दास निभावणार आहेत.

शक्तिकांत दास हे २०१८ ते २०२३ सालापर्यंत आरबीआयचे गर्व्हनर म्हणून भूमिका निभावली आहे. कोव्हिड काळात त्यांनी देशात आर्थिक सुधारणा करण्यात महत्वाची भूमिका निभावली. केंद्र सरकारने त्यांचा कालावधी तीन वर्षांनी वाढवला आहे. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे २५ वे गर्व्हनर ठरले.

शक्तिकांत दास हे ओडिशाच्या भुवनेश्वर येथे राहणारे आहेत. ते तामिळनाडूच्या कॅडरच्या १९८० बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्र आणि तामिळनाडू सरकारच्या विविध पदांवर काम केलं आहे. त्यांनी केंद्रातील विविध विभागात सचिव, राजस्व सचिव म्हणून काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

SCROLL FOR NEXT