salary
salary  saam Tv
देश विदेश

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात होणार 'इतकी' वाढ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. पुढच्या महिन्यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Employee) महागाई भत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून महगाई भत्ता वाढवण्यावर अधिकृत भाष्य करण्यात आलं नाही. मात्र, काही वृत्ताच्या माहितीनुसार सरकारडून महागाई भत्ता (DA) वाढवण्यावर काम सुरू आहे. ( 7th Pay Commission News In Marathi )

मिळालेल्या माहितीनुसार, खरं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारकडून ३४ टक्के दरानुसार महागाई भत्ता देण्यात येत आहे. यावर्षी मार्चमध्ये महागाई भत्ता वाढवला होता.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार (Salary) दिला जातो. केंद्र सरकार दरवर्षी महागाई भत्त्यांमध्ये वाढ करते. तसेच केंद्र सरकार पुढे कोणत्याही प्रकारचे नवे वेतन आयोग आणणार नाही. त्यामुळे सरकारकडून कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यासाठी हा नवीन फॉर्मुला आमलात आणला जाऊ शकतो.

रिपोर्टनुसार, केंद्र सरकार कामगिरीच्या आधारावर वेतन वाढवण्यासाठी सदर फॉर्मुला वापरात आणू शकते. त्याप्रमाणे सरकारची तयारी सुरू आहे. त्या फॉर्मुल्यानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनात वाढ करण्यात येऊ शकते. या प्रक्रियेला 'ऑटोमेटिक पे सिस्टम' नाव देण्यात येऊ शकते. ६८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५२ पेन्शनधाराकांना ५० टक्के महागाई भत्त्यामध्ये वाढ ही 'ऑटोमेटिक पे सिस्टम' प्रक्रियेनुसार होऊ शकते.

दरम्यान, केंद्रीय सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी केली तर त्याचा फायदा निम्न स्तरावरील कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. लेव्हल मैट्रिक्स १ ते ५ मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी कमीत कमी २१ हजार होऊ शकते. केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना बरोबरीचा फायदा मिळावा हा उद्देश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil News : भाजपचे इंजिन बंद पडल्यामुळे मनसेचे इंजिन सोबत घेतले; जयंत पाटील यांची खोचक टीका

Today's Marathi News Live : उत्तर मुंबई पियुष गोयल यांची भव्य रॅली; महायुतीचे हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी

Electric Car Tips: तुमच्याकडे जर असेल इलेक्ट्रिक कार, तर सर्व्हिसिंग करताना ठेवा 'या' गोष्टी लक्षात

Maharashtra Politics: अंतरवाली सराटीत राजकीय खलबतं? जय पवारांनी अचानक घेतली मनोज जरांगेंची भेट, चर्चांना उधाण

Akola News : बड्या डॉक्टरांविरुद्ध होती तक्रार; पोलिसांनी महिलेला रात्री २ वाजेपर्यत ठाण्यातचं ठेवले बसवून, कारवाईच्या दिल्या धमक्या

SCROLL FOR NEXT