serum institute of india saam tv
देश विदेश

Corona Vaccine : चीनने पुन्हा टेन्शन वाढवलं; 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'कडून केंद्र सरकारला मदतीचा हात

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) केंद्र सरकारला कोव्हिशील्ड लसच्या दोन कोटी मोफत डोस मदतीच्या स्वरुपात देण्याच्या विचारात आहे

Vishal Gangurde

Corona Vaccine : चीनसह काही देशात कोरोना रुग्णात वाढ होत आहे. काही देशात कोरोना रुग्ण वाढत असताना सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) केंद्र सरकारला कोव्हिशील्ड लसच्या दोन कोटी मोफत डोस मदतीच्या स्वरुपात देण्याच्या विचारात आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली. (Latest Marathi News)

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूटचे प्रकाश कुमार सिंग यांनी आरोग्य मंत्रालयाला ४१० कोटी रुपयांचे मोफत डोस देण्यासाठी पत्र लिहिले आहे. सिंग यांनी हे मोफत डोस सरकारला कसे देता येईल, याबाबत विचारणा केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आतापर्यंत राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत सरकारला कोव्हिशील्डच्या १७० कोटी रुपयांचे मोफत डोस दिले आहेत. चीन आणि दक्षिण कोरियासहित अन्य काही देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात अलर्ट जारी केला आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

अधिकृत सूत्रांनी बुधवारी सतर्क केले आहे की, देशासाठी पुढील चाळीस दिवस महत्वाचे असणार आहेत. कारण देशात जानेवारी महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. तर दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे की, कोरोनासाथ लाट पुन्हा परतल्यास देशात कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्याऱ्या रुग्णांची संख्या कमी असेल.

केंद्र सरकारने शनिवारी विमानातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशात कोरोना साथीचा सामना करण्यासाठी एक बैठकीचं आयोजन केलं होतं. तसेच मंगळवारी देशभरात कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक रुग्णालयात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bandra-Worli sea link : २५० च्या स्पीडने पळवली लँबर्गिनी, मुंबईतील सी लिंकवरील व्हिडिओ

Maharashtra Live News Update: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT