"नवऱ्याने नीट झोपूही दिलं नाही, मला सेक्स स्लेव बनवलं" भाजप आमदाराच्या सुनेचा गंभीर आरोप SaamTv
देश विदेश

"नवऱ्याने नीट झोपूही दिलं नाही, मला सेक्स स्लेव बनवलं" भाजप आमदाराच्या सुनेचा गंभीर आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : सोशल मिडियावरती (Social Media) एका भाजपा नेत्याच्या सुनेने गंभीर आरोप केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये तिने तिच्या नवऱ्य़ानेच तिला सेक्स स्लेव (Sex slave) बनवून वापर केला असल्याचा धक्कादायक आऱोप तिने नवऱ्यावरती केला आहे. लग्नानंतर ६ महिन्यांतच मी जिवंत मृतदेहाप्रमाणे जगत असल्याचा धक्कादायक खुलासाही तिने केला आहे. सदर प्रकार हा मध्य प्रदेशातील (MP) नरसिंहपूर येथील भाजपा आमदार जालम सिंह पटेल (BJP MLA Jalam Singh Patel) यांची सून नीतू सिंह हिने हे आरोप केले आहेत.

तसंच आता मी दिल्लीमध्ये नोकरी करत असून तिथेच रहात आहे आणि न्यायालयात घटस्फोटासाठी लढत असल्याचं ती म्हणाली. २०१६ मध्ये तिने आमदार जालम सिंह पटेल यांच्या मुलासाठी विचारणा झाली होती. तेव्हा तिचं वय २६ वर्षे होतं त्यावेळी तिने यया लग्नाला नकार दिला होता मात्र तिला दबावामुळे लग्न करावं लागलं तसंच लग्नानंतर तिला नवऱ्यावरती हत्या, हत्येचा प्रयत्न यासारखे 45 गुन्हे दाखल असल्याचं समजलं असंही ती म्हणाली.

दरम्यान, आपल्या नवऱ्याने लग्नाच्या आधीदखील शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली होती. नकार दिल्याचा राग मनात ठेवत त्यानी आपल्यावरती सदैव पाळत ठेवली फोन नंबर बदलला, घरातून बाहेर येण जाण बंद केलं असेही आरोप नीतूने केले असून तो आपणाला सतत मारहाण करायचा नीट झोपूनही देत नव्हता आणि त्यामुळेच तिची प्रकृती ढासळल्याचही या आमदाराच्या सुनेनं म्हटलं आहे.

तिला होणाऱ्या या त्रासाबाबत तिने माहेरच्या मंडळींना अनेकदा सांगितलं. मात्र त्यांनी काही वेळाने सर्व ठीक होईल असं सागंत थोडं समजून घेण्याचा सल्ला दिला. तिने याबाबत आमदार सासऱ्याला देखील सांगितलं. मात्र त्यांनीही सर्व ठीक होईल असंच सांगितल मात्र काहीही कारवाई केली नसल्याचही नीतूने म्हटलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT