Oscar Fernandes| ज्येष्ठ काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन SaamTvNews
देश विदेश

Oscar Fernandes| ज्येष्ठ काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं आज वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बंगळुरू : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस (Oscar Fernandes) यांचं आज वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालं. जुलै महिन्यामध्ये घरात योगासने करताना ते तोल जाऊन पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्या होत्या. त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. मात्र, प्रकृती खालावत गेल्याने अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

हे देखील पहा :

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणून ऑस्कर फर्नांडिस यांची ओळख होती. ते 'ब्रदर ऑस्कर' या नावाने लोकप्रिय होते. राजकीय पटलावर अनेक महत्वपूर्ण पदे त्यांनी भूषवली होती. फर्नांडिस यांच्या निधनावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. "फर्नांडिस हे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते होते. त्यांची दूरदृष्टीचा तत्कालीन राजकारणावर मोठा प्रभाव होता. त्यामुळे काँग्रेस परिवार त्यांच्या मार्गदर्शनाला मुकला आहे," असं त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "माजी राज्यसभा खासदार श्री.ऑस्कर फर्नांडिस जी यांच्या निधनाने दु: खी झालो. या दु:खाच्या वेळी, माझे विचार आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसह आणि हितचिंतकांसोबत आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो" असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

ऑस्कर फर्नांडिस यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९७० मध्ये केली. १९८० मध्ये कर्नाटकातील उडुपी मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९८४, १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये ते याचं मतदारसंघातून खासदार झाले होते. त्यानंतर १९९८ मध्ये ते राज्यसभेवर निवडून व त्यानंतर २००४ मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले. युपीए सरकारमध्ये त्यांनी रस्ते वाहतुक मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. फर्नांडिस हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे विश्वासू नेत्यांपैकी मानले जात होते. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरमाशीला किती पाय असतात माहितीये का? 99% लोकांना नसेल माहिती

Maharashtra Live News Update: जळगावच्या चोपड्यामधील स्ट्राँग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बंद

Mahadhan Yog: 9 दिवसांनी या राशींच्या आयुष्यात येणार पैसा; शुक्र ग्रह बनवणार अद्भुत राजयोग

Farmers Protest: शेतकरी आंदोलनात हिंसाचार उसळला; दगडफेकीनंतर १८ वाहनांना पेटवलं, अख्या शहरात इंटरनेट बंद, हनुमानगड का पेटलं?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले, २१०० रुपये...

SCROLL FOR NEXT