Senior Congress leader Azhar Yar Khan passes away; leaders and supporters pay their last respects in Shahabad. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; देशाच्या राजकारणात शोककळा

Senior Congress Leader Azhar Yar Khan Death News In Uttar Pradesh: उत्तरप्रदेशातील हरदोई शाहाबाद येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजहर यार खान यांचे लखनऊ येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

Omkar Sonawane

हरदोई शाहाबाद येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजहर यार खान यांचे बुधवारी लखनऊ येथील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

बुधवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शाहाबाद येथील त्यांच्या पैतृक कब्रस्तानात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. निवृत्तीनंतरचे सर्व आयुष्य त्यांनी काँग्रेसबाबत राजकारणात घालवले. ते काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. अजहर यार खान यांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळावू होता. तळागळाशी असलेले नेतृत्व काळाच्यापडद्याआड गेल्याने काँग्रेसमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजहर यार खान यांनी पोलीस सेवेत अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केले होते. निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते काँग्रेसच्या विचारसरणीशी निष्ठावान राहिले आणि शेवटपर्यंत पक्षासाठी कार्यरत होते. निधनाच्या वेळी ते काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

त्यांच्या जाण्याने पक्षाने एक अनुभवी, समर्पित आणि प्रामाणिक नेता गमावला आहे,” अशा शब्दांत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आठवणी कायम जिवंत राहतील, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा विस्तृत परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनेक ठिकाणी शोकसभांचे आयोजन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खड्ड्यांवरून नाशिकमध्ये राजकारण तापलं, भुजबळांनी कुंभमेळा मंत्री महाजनांना सुनावलं

परवानगी १४ ची, बांधले २१ मजले! केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे; बिल्डर आणि अधिकाऱ्यांची अशी झाली पोलखोल

Fennel Seeds : कच्ची की भाजलेली बडीशेप? आरोग्यासाठी कोणती अधिक योग्य?

बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

SCROLL FOR NEXT