Senior BJP MLA Govind Parmar, a four-time legislator from Umreth in Gujarat, passed away, leaving the political fraternity in mourning. Saam TV
देश विदेश

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; ज्येष्ठ नेते, आमदाराचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Senior BJP Leader Govind Parmar Death News: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उमरेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोविंद परमार यांचे निधन झाले. चार वेळा आमदार राहिलेल्या या अनुभवी नेत्याच्या जाण्याने गुजरातच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Omkar Sonawane

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोविंद परमार यांचे शुक्रवारी निधन झाले. या दु:खद घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर गुजरात येथील आनंद शहरातील रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यांच्या निधनानंतर भाजपच्या नेत्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ते म्हणाले उमरेठ विधानसभेचे लोकप्रिय आमदार गोविंद भाऊ परमार यांच्या निधनाचे वृत्त आता समजले. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो! तसेच ईश्वर त्याच्या कुटुंबीयांना या दुखातून सावरण्यास बळ देवो अशी प्रार्थना त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की आनंद शहराचे आणि गुजरातचे अनुभवी नेता जे चारवेळा आमदार राहून गेले. त्यांच्या जण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

कोण होते गोविंद परमार?

गोविंद परमार यांनी आपला राजकीय प्रवास 30 वर्षांपूर्वी केला होता. 1995 मध्ये ते आनंद जिल्ह्यातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी 1998 मध्ये कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉँग्रेसच्या तिकिटावर ते पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र 2003 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. परभवानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2008 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली मात्र त्याहीवेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2017 आणि 2022 च्याक विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: पार्टीत 'नव्या' मिस्ट्री मॅनसोबत दिसली मलाइका अरोरा; रोमँटिक फोटोमुळे चर्चांना उधाण

Nashik : नाशिकमध्ये सर्वात मोठा भूखंड घोटाळा उघड, ४९ बिल्डर कचाट्यात सापडले, वाचा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीत सिंग याची चौकशी करू नका, शरद पवार पक्षाची मागणी

Central Bank Jobs: १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Thin Hair Care Tips: पातळ केस दाट होण्यासाठी काय उपाय करायचे?

SCROLL FOR NEXT