Senior BJP leader Ajay Mishra, nephew of former Prime Minister Atal Bihari Vajpayee, passes away after prolonged illness in Gwalior. Saam tv
देश विदेश

भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे निधन! पक्षाचा अनुभवी चेहरा काळाच्या पडद्याआड; राजकीय वर्तुळात शोककळा

Senior BJP Leader Ajay Mishra Illness And Death Details: भाजपचे ज्येष्ठ नेते अजय मिश्रा यांचे ग्वालियरमध्ये निधन झाले. ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भाचे होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Omkar Sonawane

भाजपचे ज्येष्ठ नेते अजय मिश्रा यांचे निधन झाले आहे. ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भाचे होते. तसेच मध्यप्रदेशचे माजी मंत्री अनुप मिश्रा यांचे छोटे भाऊ होते. मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये त्यांचे बुधवारी निधन झाले. दिवंगत अजय मिश्रा बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनामुळे पक्षात शोककळा पसरली आहे. दिवंगत अजय मिश्रा यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने लोक पोहोचले आहेत. त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव, अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि भाजप नेत्यांनी दिवंगत अजय मिश्रा यांना श्रद्धांजली वाहिली आणि शोक व्यक्त केला. राज्यभरातील लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भाचे अजय मिश्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी या संदर्भात ट्विट करून दिवंगत मिश्रा यांना श्रद्धांजली वाहिली.

पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, दिवंगत अजय मिश्रा बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची प्रकृती खालावल्यावर अजय मिश्रा यांना ग्वालियरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर श्वास घेण्यास होणारा त्रास आणि इतर आरोग्य समस्यांवर उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच अजय मिश्रा यांचे निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Accident: भीषण अपघातात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू, महामार्गावरील अपघाताचा थरारक VIDEO

Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; डिमेन्शिया आजाराशी झुंज ठरली अपयशी, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Fruit Combination: केळी आणि सफरचंद एकत्र खाल्ल्यानंतर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विकास लवांडे यांना न्यायालयीन कोठडी

Cricketer Retirement : क्रिकेटनं मला जगायला शिकवलं!...IPL सुरू असतानाच भारताच्या स्टार क्रिकेटपटूचा संन्यास

SCROLL FOR NEXT