Seema Haider Viral Photo 
देश विदेश

Seema Haider Photo: सीमा हैदर पाकिस्तानची सैनिक? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Seema Haider Viral Photo: प्रियकरासोबत पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर ही पाकिस्तानची सैनिक होती असा दावा करण्यात आलाय. तिचा आता फोटो व्हायरल करण्यात आलाय. पण, खरंच सीमा सैन्यात होती का ? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

सीमा हैदर, सीमा पाकिस्तानात सैनिक होती असा दावा करण्यात आलाय. पाकिस्तानी सैनिक असतानाचा सीमाचा फोटो आता व्हायरल करण्यात आलाय. पाकिस्तानी सैन्यात ती कॅप्टन होती असा धक्कादायक दावा करण्यात आल्याने खळबळ उडालीय.

पण, खरंच सीमा भारतात पाकिस्तानचं काम करण्यासाठी आलीय का? ती भारतात काही कारवायांसाठी लग्न करून आलीय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. मात्र, या फोटोत तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

सीमा हैदर पाकिस्तानी आर्मीत कॅप्टन म्हणून कार्यरत होती.सैन्यातील नोकरी सोडून ती लग्न करून भारतात आली. सीमाने पाकिस्तानातच असताना पतीला तलाक दिला. त्यानंतर सीमाचे भारतात राहणाऱ्या सचिन मीणाशी प्रेमसंबंध जुळले. पब जी गेमवरून सुरू झालेल्या प्रेमाची स्टोरी हळूहळू फुलत गेली आणि सीमा पाकिस्तानातून दुबई, दुबईतून नेपाळ आणि नेपाळहून घुसखोरी करून 4 मुलांसह भारतात आली.

सीमा भारतात येताच ती पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.त्यानंतर तिचे सगळे पेपर एटीएसने जमा करून चौकशी केली. मात्र, अजून तिच्यावर कारवाई झालेली नाही आता तिच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आल्याने आणखी संशयाच्या भोवऱ्यात अडकलीय. पण, खरंच सीमा हैदर पाकिस्तानी सैन्यात होती का? तिच्या व्हायरल फोटोची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

सीमा हैदर ही पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन नव्हती

सीमा हैदर पाकिस्तानात गृहिणी होती

सीमाचा पाकिस्तान सैन्याचा ड्रेस AI जनरेटेड

भारत-पाकिस्तान तणावामुळे फोटो व्हायरल

सीमा ही पाकिस्तानी सैन्यात कधीच नव्हती.सध्या भारत-पाकिस्तानात तणाव निर्माण झाल्याने सीमाचा सैनिकांच्या ड्रेसमधील फोटो व्हायरल करून ती पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा केला. मात्र, आमच्या पडताळणीत सीमा पाकिस्तानात सैनिक असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT