Seema haider  Saam tv
देश विदेश

Seema haider : बॉयफ्रेंडसाठी पाकिस्तानाहून भारतात आलेली सीमा हैदर स्वगृही जाणार? महत्वाची माहिती आली समोर

Seema haider News : बॉयफ्रेंडसाठी पाकिस्तानाहून भारतात आलेली सीमा हैदर स्वगृही जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सीमा हैदरविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केले आहेत. त्यांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या आदेशानंतर बॉयफ्रेंडसाठी भारतात आलेल्या सीमा हैदरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. पाकिस्तानहून भारतात आलेली सीमा हैदर देखील पुन्हा स्वगृही जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, सीम हैदर पाकिस्तान जाणार असल्याचा दावा वकील एपी सिंह यांनी दिली आहे.

वकील एपी सिंह यांच्या दाव्यानुसार, सीमा हैदर मूळची पाकिस्तानची आहे. पबजी खेळता खेळता ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा येथील सचिन मीणाच्या संपर्कात आली. दोघेही पबजी खेळता खेळता एकमेकांच्या प्रेमात पडले. सीमा पती गुलाम हैदरला सोडून चार मुलांना घेऊन नेपाळमार्गे बेकायदेशीररित्या भारतात आली. भारतात आल्यानंतर वकील एपी सिंह यांच्या मदतीने सचिन मीणासोबत लग्न केलं. काही महिन्यांपूर्वी सीमा हैदरने एका बाळाला जन्म दिला आहे.

एसपी सिंह यांनी पुढे सांगितलं की, 'सीमा हैदर भारतात आली,तेव्हापासून भारताच्या कायद्याचे पालन करत आहे. सीमा हैदरला उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दुसरीकडे सीमा हैदरचा पती गुलाम हैदरने भारत सरकारला विनंती केली आहे की, 'सीमा हैदरची भारतातून हकालपट्टी करा. हकालपट्टी करण्यास शक्य नसल्यास भारतातच शिक्षा द्या. परंतु माझ्या चार पोरांनाही पाकिस्तानला पाठवा'.

सरकारने काय आदेश दिले?

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवरील हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारने पाच मोठे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना पुढील दोन दिवसांत भारत सोडावा लागणार आहे. तर दुसऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश मिळणार नाही. केंद्र सरकारने सिंधू जल करारही स्थगित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT