Seema Haider: ४ मुलांसोबत सचिनला भेटायला भारतात आली, पाकिस्तानची सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार

Seem Haider Pregnant: 'पाकिस्तानी भाभी' नावाने प्रसिद्ध असलेल्या सीमा हैदरने स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आई होणार असल्याचे सांगितले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Seema Haider: ४ मुलांसोबत सचिनला भेटायला भारतात आली, पाकिस्तानची सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार
Seem Haider PregnantSaam Tv
Published On

पाकिस्तानमधून आपल्या ४ मुलांसोबत भारतामध्ये आलेल्या सीमा हैदरला आज सगळेच ओळखतात. सीमा हैदर आपल्या प्रियकराला भेटायला भारतामध्ये आली आणि इथेच राहिली. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सीमा हैदरने पतीसोबत व्हिडीओ शेअर केला आहे. नवीन वर्षाची सुरूवात होण्यापूर्वीच सचिन मीणा आणि सीमा हैदरच्या घरामध्ये नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सीमा हैदर प्रेग्नेंट असून तिने बेबीबंपसोबत फोटो शेअर करत ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली.

'पाकिस्तानी भाभी' नावाने प्रसिद्ध असलेल्या सीमा हैदरने स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आई होणार असल्याचे सांगितले. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सीमा हैदर ही गुड न्यूज दिली. फेब्रुवारी महिन्यामध्ये सिमा सचिनच्या मुलाला जन्म देणार आहे. सचिन मीणाला नेहमीच पाकिस्तानचा भावोजी म्हणून चिडवले जाते. आता सचिनने सीमाच्या प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केल्यानंतर पाकिस्तानलाच डिवचले आहे. सचिनने सांगितले की सीमाच्या या व्हिडीओला खूप शेअर करा की ही गोष्ट माझ्या सासरी म्हणजेच पाकिस्तानपर्यंत पोहचेल.

व्हिडीओमध्ये सीमा हैदरने आपल्या ७ महिन्यांचा बेबीबंप दाखवला आहे. सीमा हैदर आणि सचिन मीणा घरा नवा पाहुणा येणार असल्यामुळे खूपच आनंदी दिसत आहेत. सीमा हैदरने इन्स्टावर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी ७ महिन्यांची प्रग्नेंट आहे. लवकरच आमच्या घरामध्ये चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. आमच्या मुलाला वाईट नजर नको लागायला म्हणून आम्ही ही गोष्ट आतापर्यंत लपवून ठेवली. आम्हाला वाटत होते की जेव्हा सर्वकाठी ठिक होईल तेव्हाच आपण घोषणा करूया.

सीमा हैदर आणि सचिन मीणा यांची ओळख ऑनलाइन पबजी गेम खेळताना ओळख झाली. त्यानंतर सीमा आणि सचिन नेपाळमध्ये भेटले. त्यानंतर सीमा हैदर आपल्या मुलांना घेऊन अवैधरित्या भारतामध्ये आली. सीमा हैदर सध्या मीणा कुटुंबीयांसोबत ग्रेटर नोएडा येथील रबुपुरामध्ये राहते.

सचिन आणि मीनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. सीमा हैदर देखील भारतामधील सण साजरे करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. बेकायदेशीर घुसखोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. सीमाचे पती गुलाम हैदर पाकिस्तानमध्ये राहतात. त्यांनी सीमाविरोधात गुन्हा देखील दाखल केला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com