Kills Neighbour For Wife Saree Saam TV
देश विदेश

Guard Killed Neighbors For Saree: पत्नीच्या साडीसाठी शेजाऱ्याची गोळी झाडून हत्या; धक्कादायक घटनेनं हरियाणात खळबळ

Gurugram News: पत्नीची तक्रार घेऊन ड्यूटीवर गेल्यावर अजयने पिंटूला याबाबत विचारले.

Ruchika Jadhav

Haryana Crime News:

हरियाणातील गुरुग्राममधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आपल्या पत्नीची साडी चोरल्याच्या संशयातून पतीने चोरी करणाऱ्या व्यक्तीची हत्या केली आहे. साडी चोरल्याने आरोपीने थेट संशयीतावर गोळी झाडून त्याला ठार केलं आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, अजय कुमार असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे. तर पिंटू असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हे दोघेही सुरक्षारक्षक म्हणून एकाच ठिकाणी कार्यरत होते. अजयची पत्नी रिना हिने काल आपल्या पतीकडे पिंटूची तक्रार केली होती.

माझी साडी पिंटूने चोरली असं तिने पतीला सांगितलं. पिंटू आणि अजय एकाच ठिकाणी काम करत असल्याने ते एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. पत्नीची तक्रार घेऊन ड्यूटीवर गेल्यावर अजयने पिंटूला याबाबत विचारले. तेव्हा आपण असं काही केलेलं नाही असं त्याने सांगितलं.

घरी आल्यावर या दोघांमध्ये पुन्हा मोठा वाद पेटला. वाद विकोपाला जाऊन अजय आपल्या खोलीत गेला आणि बंदूक घेऊन तो बाहेर आला. त्याने रागाच्या भरात पिंटूवर बंदूक रोखली आणि गोळी झाडली.पत्नीच्या साडीसाठी एका व्यक्तीची हत्या केल्याने हरियाणात या घटनेनं खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Shraddha Kapoor - Eetha Video : श्रद्धा कपूरच्या 'ईथा'चा अंगावर काटा आणणारा टीझर, कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?

Train weight distribution: अनेक टन वजन असलेल्या ट्रेन धावूनही रेल्वेचे रूळ तुटत कसे नाहीत?

Irregular meal timings: दररोज वेगवेगळ्या वेळेस जेवल्याने पोटावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची बाब

SCROLL FOR NEXT