thailand bus fire x social media
देश विदेश

Bus Fire : शाळेची सहल अखेरची ठरली; आगीत लक्झरी बसचा कोळसा, २५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू, VIDEO

Vishal Gangurde

नवी दिल्ली : थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीत २५ विद्यार्थी आणि शिक्षकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेने थायलंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अचानक बसला आग लागून विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मंगळवारी शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक बसने सहलीला निघाले होते. याच बसला अचानक आग लागली. या बसला लागलेल्या आगीच्या धुरात अनेक जण अडकले. या बसच्या आगीत २५ विद्यार्थ्यांसहित शिक्षक होरपळले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. यानंतर काही विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आलं.

थायलंडचे परिवहन मंत्री सुरिया जुंगरुंगरुएंगकित यांनी घटनेची खात्री केली आहे. या बसमध्ये एकूण ४४ जण प्रवास करत होते. बसमधून १९ जणांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलं. तर बाकीचे लोक या बसमध्ये अडकले. त्यामुळे बसमधील उर्वरित लोकांचा होरपळून मृत्यू झाला, असं सांगण्यात येत आहे.

बसमधील शाळकरी विद्यार्थी आणि शिक्षक हे राजधानी बँकॉकहून अयुत्थाया येथे जात होते. त्याचवेळी पथुम थानी प्रांतात ही भयंकर घटना घडली. दुपारच्या सुमारास ही आगीची घटना घडली. या दुर्घटनेत नेमके किती जणांचा मृत्यू झाला? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या बसमधील एकूण वाचलेल्या विद्यार्थ्यांवरून २५ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला जात आहे. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बसला अचानक आग का लागली?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बसला आग लागल्यानंतर काळ्या धुराचे लोट हवेत पसरताना दिसत आहेत. या घटनेत मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचं वय आणि घटनेविषयी अद्याप आणखी माहिती मिळालेली नाही. या घटनेत विद्यार्थ्यांचा बचाव करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, 'धावत्या बसचा अचानक टायर फुटल्याने आग लागली आहे. आतापर्यंत घटनास्थळावरून कमीत कमी १० मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. काही जणांच्या मृतदेहांचा कोळसा झाल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli- Arbaz Patel: 'संपले जरी सारे तरी...' बिग बॉसच्या घरात निक्की- अरबाजचा खेळ सुरूच

Coffee Scrub: चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हा' स्क्रब करा ट्राय...

Marathi News Live Updates : शरद पवार स्वतः इच्छुकांच्या घेणार मुलाखती

Navratri 2024: सणा-सुदीच्या दिवसात झपाट्याने वजन वाढतंय? 'या' पद्धतीने करू शकता कंट्रोल

Kesar Panchmeva Kheer: देवी भरभरून आशीर्वाद देईल आणि प्रसन्न होईल; नैवेद्यात बनवा पंचमेवा खिर

SCROLL FOR NEXT