Satyendar Jain Update News  SAAM TV
देश विदेश

२.८८ कोटी कॅश, १३३ सोन्याची नाणी; सत्येंद्र जैन यांच्यासह सहकाऱ्यांवरील छापेमारीत ईडीच्या हाती घबाड

मनी लाँडरिंग प्रकरणाचा तपास सुरू असून, ईडीने सत्येंद्र जैन यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी छापे मारले.

Nandkumar Joshi

नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) आणि त्यांचे सहकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचलनालयानं (ED) छापे मारले. या छापेमारीत ईडीच्या पथकांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.

सत्येंद्र जैन आणि सहकाऱ्यांच्या मालमत्तांवरील छापेमारीत ईडीच्या पथकाला मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड सापडली आहे. ईडीने काल, सोमवारी सात ठिकाणांवर छापे मारले होते. त्यात प्रकाश ज्वेलर्सकडे २.२३ कोटींची रोकड मिळाली आहे. वैभव जैन यांच्याकडे ४१.५ लाखांची रोकड आणि १३३ सोन्याची नाणी सापडली आहेत. तर जी.एस. मथारू यांच्याकडे २० लाखांची रोकड मिळाली आहे.

ईडीच्या छापेमारीत घबाड सापडल्यानंतर काही वेळातच आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण ताकदीने आम आदमी पक्षाच्या पाठीमागे लागले आहेत. विशेषतः दिल्ली आणि पंजाब सरकारच्या पाठीमागे लागले आहेत. तुमच्याकडे सर्व यंत्रणांची ताकद आहे. पण आमच्यासोबत परमेश्वर आहे, असं केजरीवाल म्हणाले.

ईडीने सत्येंद्र जैन यांच्याविरोधात मनी लाँडरिंग (money laundering) प्रकरणी त्यांचे निवासस्थान आणि अन्य ठिकाणांवर छापे मारले. तर सत्येंद्र जैन आणि त्यांच्या कंपनीसह अन्य आरोपींशी संबंधित ठिकाणांवर सोमवारी ईडीने छापे मारले. तत्पूर्वी, पीएमएलए अंतर्गत जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ३० मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने ९ जूनपर्यंत त्यांची रवानगी कोठडीत केली आहे.

ईडीची छापेमारी कुठे?

दिल्लीमधील प्रसिद्ध राम प्रसाद ज्वेलर्सवरही ईडीने छापे मारले. सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित राम प्रकाश ज्वेलर्सच्या ठिकाणांवरही छापे मारले. गेल्या काही दिवसांत जैन आणि काही कथित हवाला ऑपरेटर यांच्या चौकशीतून ईडीला काही नवीन पुरावे आणि स्रोतांची माहिती मिळाली आहे, असे सांगितले जाते. त्यानंतर आणखी माहिती आणि पुरावे गोळा करण्यासाठी ही छापेमारी करण्यात आली, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सत्येंद्र जैन यांच्या घरी काही मिळालं नाही! - संजय सिंह

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांच्या घरी ईडीच्या पथकाला काही मिळालं नाही. जैन यांना अडकवण्यासाठी कुणालाही त्यांचे जवळचे सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. सत्येंद्र जैन यांच्या घरी काहीच मिळालं नाही, म्हटल्यावर भाजपकडून काहीही आरोप केले जात आहेत. जैन यांच्या घरी २ लाख ७९ हजार रुपये सापडले आहेत. इतकंच. बाकी सगळं खोटं आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Rain Live News : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT