Prateek Yadav, younger son of Mulayam Singh Yadav and brother of Akhilesh Yadav, passed away at the age of 38 in Lucknow. Saam TV Marathi
देश विदेश

Prateek Yadav : अखिलेश यादव यांच्या धाकट्या भावाचे निधन; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण अस्पष्ट

Prateek Yadav Death Reason: समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव प्रतिक यादव यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. लखनऊतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Namdeo Kumbhar

Prateek Yadav Death : समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांचे आज सकाळी निधन झाले. लखनऊ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रतीक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव या उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नेत्या आहेत. प्रतीक यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

प्रतीक यादव हे 'फिटनेस प्लॅनेट' जिमचे मालक होते, त्याशिवाय रिअल इस्टेटमध्येही त्यांची मोठी गुंतवणूक होती. प्रतीक यादव यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रतीक यादव यांच्या निधनाच्या वृत्ताने यादव कुटुंब आणि समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.

प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. काही वेळापूर्वी त्यांना लखनऊमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या काळात अपर्णा यादव आणि अखिलेश यादव यांनी त्यांची भेट घेतली होती. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. प्रतीक यादव हे नियमित व्यायाम करत असत आणि काही औषधेही घेत होते, असे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पूर्णपणे निरोगी दिसत नव्हते, मात्र हा आजार जीवघेणा ठरेल याची कल्पना कोणालाही नव्हती. प्रतीक यादव यांचा मृतदेह सध्या रुग्णालयात असून कुटुंबीय तेथे दाखल झाले आहेत.

आपल्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असूनही प्रतीक यादव यांनी राजकारणाऐवजी रिअल इस्टेट आणि फिटनेस क्षेत्रात करिअर निवडले होते. त्यांनी युनायटेड किंगडममधील लीड्स विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली होती. प्रतीक यादव हे फिटनेसचे अत्यंत शौकीन होते आणि लखनऊमध्ये त्यांची स्वतःची जिमही होती.

प्रतीक यादव हे 'फिटनेस प्लॅनेट' या जिमचे मालक असण्यासोबतच 'जीव आश्रय' नावाची एक सामाजिक संस्थाही चालवत होते. ही संस्था रस्त्यावरील कुत्र्यांवर उपचार करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना अन्न पुरवण्याचे काम करते. सामाजिक कामात सक्रिय असतानाही प्रतीक आपल्या फिटनेसकडे बारकाईने लक्ष देत असत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती, परंतु त्यांना नेमका कोणता आजार होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

SCROLL FOR NEXT