pakistan news  saam tv
देश विदेश

India Pakistan News: भारताच्या शत्रूची पाकमध्ये हत्या, भारतातील हल्ल्यांचा सैफुल्ला मास्टरमाईंड, सैफुल्लानंतर पुढचा नंबर हाफीजचा?

Saifullah Khalid: भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा आहे भारताचा शत्रू सैफुल्ला खालिद..... लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर.... भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाईंड.... मात्र पाकिस्तानच्या सिंध प्रांतात याच सैफुल्लावर अज्ञात व्यक्तीनं गोळया झाडल्या आणि सैफुल्लाचा खात्मा केला... त्यामुळं पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क हादरुन गेलंय.... सैफुल्लाच्या हत्येनंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आलाय... पाकच्या झेंड्यात सैफुल्लाचा जनाजा निघालाय... मात्र या सैफुल्लानं भारताच्या हृदयावर ओरखडे ओढलेत....

Omkar Sonawane

भारताचा शत्रू सैफुल्ला खालिद

2001

रामपूर सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला

2005

बँगलोरच्या भारतीय विज्ञान काँग्रेस संस्थेवर हल्ला

2006

आरएसएसच्या मुख्यालयावर हल्ला

भारतात हल्ल्यानंतर हाच सैफुल्ला खालिद नेपाळमध्ये जाऊन लपला.. तिथं विनोद कुमार नावानं राहत होता... एवढंच नाही तर नेपाळमध्ये राहून लष्कर ए तोयबाच्या मिशनची आखणी करायचा... मात्र गेल्या काही महिन्यांपुर्वी सैफुल्ला सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्यात राहायला गेला.. तो तिथं लष्कर ए तोयबात तरुणांच्या भर्तीसाठी काम करायचा.

.मात्र पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे अड्डेच लक्ष्य केल्यानं सैफुल्ला भुमिगत झाला... मात्र अखेर सैफुल्लाचे दिवस भरले आणि मारेकऱ्यांनी त्याचा काटा काढलाय....त्यामुळं मसूद अजहर आणि हाफिज सईदचे धाबे दणाणलेत... आता हाफीज असो वा मसूद.... ज्यांनी भारताच्या हृदयावर ओरखडे ओढलेत ते कुठल्याही बिळात लपून बसले तरी त्यांचा खात्मा निश्चित आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

SCROLL FOR NEXT