MahaKumbh Saam Tv
देश विदेश

MahaKumbh: मी साध्वी नाहीये, सोशल मीडियावर व्हायरल झालेली हर्षा रिछारिया असं का म्हणाली?

Harsha Richhariya Viral Video: हर्षा रिछारिया यांनी त्या साध्वी नसल्याचे स्पष्ट केलंय. कृपया आपल्याला साध्वी ही पदवी देऊ नये, असे हर्षा म्हणालीय. मी कोणतेही विधी केलेले नसल्याचं तिने म्हटलंय.

Bharat Jadhav

महाकुंभ मेळ्यात आलेल्या नागा साधुंमुळे महाकुंभाची मोठी चर्चा होऊ लागलीय. याच दरम्यान एक सुंदर महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही महिला साध्वी असल्याचं म्हटलं जातं आहे. सुंदरतेमुळे या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. इतकी सुंदर असूनही त्या साध्वी झाल्याचा दावा केला जात आहे. हर्षा रिछारिया असं या महिलेचं नाव आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी नेटकऱ्यांना आणि भाविकांना मोठं आवाहन केलंय.

गेल्या दोन दिवसांपासून हर्षाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जाताहेत. यापैकी अनेकांमध्ये तिला साध्वी संबोधले जाऊ लागले आणि काही लोकांनी तिला ट्रोलही करायला सुरुवात केली. याचदरम्यान हर्षाने एका वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय की, ती साध्वी नाहीये. आपल्याला साध्वी ही पदवी देऊ नये, असे हर्षा म्हणालीय.

मी साध्वींसाठी कोणतेही विधी केलेले नाहीत किंवा मी त्यासाठी कोणतीही दीक्षा घेतलेली नाहीये. मी फक्त गुरु दीक्षा आणि मंत्र दीक्षा घेतली आहे, त्यामुळे मला साध्वी म्हणणे चुकीचे असल्याचे ती म्हणाली. पुढे भविष्यात आपल्याला अध्यात्म, सनातन धर्म आणि संस्कृतीसंदर्भात कार्य करायचे आहे, असं ती तिच्या भविष्याच्या प्लानिंगविषयी म्हणाली.

ग्लॅमरच्या दुनियेतून अध्यात्माकडे जाण्यामागील आयुष्यातील टर्निंग पॉईंटबद्दल त्यांना विचारण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या, मला वाटते की तुमचे आयुष्य आपोआप वळते. तू कुठे चालला आहेस हे तुलाच माहीत नाही. या गोष्टी आपोआप घडतात. हर्षा ह्या जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे, असं म्हटलं जातं त्यावर ती म्हणाली हे ऐकून बरं वाटतं. पण साध्वीचा टॅग देणं हे योग्य ठरणार नाही. मी अजून त्यात पूर्णपणे उतरलेले नाहीये. मी साध्वी असल्याचे कोणतेही विधान मी कुठेही केलेले नसल्याचं हर्षा रिछारिया म्हणालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT