Prayagraj Magh Mela Saam TV
देश विदेश

Prayagraj Magh Mela: साधू बाबांनी चक्क डोक्यावर केली गव्हाची शेती; सेल्फीसाठी भाविकांची तुफान गर्दी

हे बाबा चक्क गव्हाची शेती घेऊन यात्रेमध्ये आले आहेत.

Ruchika Jadhav

Prayagraj Magh Mela: सोशल मीडियावर नेहमीच अनेक मनोरंजक गोष्टी व्हायरल होतं असतात. सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे माघ मेळा सुरू आहे. या मेळ्यामध्ये नेहमीच अनेक चकीत करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. यात काही साधू बाबांच्या केसांच्या जटा अनेकांचे लक्ष वेधतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका साधू बाबाचा फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. हे बाबा चक्क गव्हाची शेती घेऊन यात्रेमध्ये आले आहेत. (Latest Viral News)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका साधू बाबांनी चक्क त्यांच्या डोक्यावर केसांमध्ये गव्हाची शेती केली आहे. चकित करणारी बाबा म्हणजे पेरलेले गहू आता थोडे उंच उगवले देखील आहेत. यात्रेत आलेल्या सर्व भाविकांचे लक्ष हे बाबा स्वत:कडे वेधून घेत आहेत.

मकर संक्रांती निमित्त अनेक भाविक माघ मेळाव्यात दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने येथील संगम तटवरती स्नान घेण्यासाठी भक्तांची गर्दी उफाळून आली आहे. अशात इथे आलेल्या साधू बाबांच्या डोक्यावरील शेती पाहून सगळेच त्यांच्याबरोबर सेल्फी घेतानाही दिसत आहेत. अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साधू बाबांबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यात गंगा, यमुना आणि सरस्वती अशा त्रिवेणीत स्नान करून अनेक भक्त तीळगुळाचे दान करत नवीन सुरूवात करतात. सकाळपासून या ठिकाणी सुमारे ४.५० लाख भावीक दाखल झाले आहेत. अशात साधू बाबांमुळे या मेळाव्याला वेगळीच रंगत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prevent Heart Attack: रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज होतील दूर, टळेल हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update: नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड

Congress: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra Board Exam : दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ! शाळा अन् महाविद्यालयांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत, पालकांची नाराजी

डोक्यावर हेल्मेट नाही, हँडलवर हात न ठेवता तरुणीने सुसाट बाईक पळवली, धोकादायक स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT