Russian bombing of Ukraine school due to 60 people died  Saam Tv
देश विदेश

भयंकर! रशियन सैन्याचा युक्रेनच्या शाळेवर बॉम्बहल्ला; ६० लोक दगावल्याची शक्यता

Ukraine-Russia war latest news : रशियन सैन्याने युक्रेनच्या पूर्व भागातील शाळेत जोरदार बॉम्बहल्ला केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : जग एकीकडे कोरोना विषाणूच्या संकटातून काही प्रमाणात बाहेर पडलं आहे. मात्र, दुसरीकडे जगावर तिसऱ्या युद्धाचे ढग कायम आहे. त्यातच रशिया (Russia)आणि युक्रेनमधील (Ukraine)युद्ध सुरुच आहे. रशियन सैन्यानेही युक्रेनवरील हल्ले वाढविले आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या युद्धामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या दरम्यान, रशियाने युक्रेनच्या पूर्व भागातील शाळेत बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यात ६० लोक मरण पावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Ukraine-Russia war latest news)

हे देखील पाहा -

एएफपी वृत संस्थेच्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्यात ६० लोक मरण पावल्याची शक्यता वर्तवली आहे. मिळेालेल्या माहितीनुसार, रशियाच्या सैन्याने पूर्व युक्रेनच्या लुहांस्क विभागातील बिलोहोरिवका गावातील शाळेत हा बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यात युक्रेनचे ६० लोक मरण पावल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हल्ल्याने शाळेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बॉम्बहल्ल्यानंतर लुहांस्कचे गव्हर्नर सेरही गदाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गदाई म्हणाले की, या शाळेत काही सामान्य लोक राहत होती. रशियाने केलेल्या या बॉम्बहल्ल्यामुळे शाळेला भीषण आग लागली आहे, असा दावा गव्हर्नर गदाई यांनी केला. तसेच चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले, अशी माहिती देखील गदाई यांनी दिली.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बापाची मुलाने केली हत्या, पोलीस भरतीसाठी पैसे न दिल्याने घेतला जीव

Dashavatar Collection : 99 रुपयांच्या ऑफरची जादू; मंगळवारी 'दशावतार' हाऊसफुल, कमाईचा आकडा किती?

Nashik Crime : शेअर मार्केटमध्ये तोटा; दोघा मित्रांनी निवडला चोरीचा मार्ग, दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

SBI Bank Robbery : एसबीआय बँकेत दरोडा, ५८ KG सोनं अन् ८ कोटींचा कॅशवर मारला हात, पंढरपूरमध्ये मिळाली चोरट्यांची कार

Tesla Model Y: महागडी टेस्ला कार वादात, काचा फोडून मुलांना काढावे लागले बाहेर, आता १.७४ लाख गाड्यांची चौकशी होणार

SCROLL FOR NEXT