नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलाॅन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यातच कोरोना विषाणूवरील 'कोव्हिशील्ड' लस बनवणारी कंपनी 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सीईओ आणि मालक अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी एलाॅन मस्क यांना एक सल्ला दिला आहे. पुनावाला यांनी ट्विट करत मस्क यांना सल्ला दिला आहे. मस्क तुमची ट्विटर (Twitter) विकत घेण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर, तुम्ही भारतामध्ये 'टेस्ला कार' तयार करण्याकडे लक्ष केंद्रित करा, असा सल्ला अदर पुनावाला यांनी दिला आहे. (Adar Poonawalla has given Special Advice To Elon Musk over tesla car in india )
हे देखील पाहा -
अदर पुनावाला ट्विट करत म्हणाले की, 'एलाॅन मस्क, तुमची ट्विटर विकत घेण्याची संपूर्ण प्रक्रिया यशस्वी झाली नाही तर, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा काही भाग हा भारतात चांगल्या दर्जाच्या टेस्ला कार (tesla car) तयार करण्यावर खर्च करा. मी खात्री देतो की, तुमच्या या गुंतवणुकीतून नक्कीच चांगला फायदा होईल.' अदर पुनावाला यांच्या ट्विटनंतर इलाॅन मस्क यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ट्विटरमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ
एलाॅन मस्क यांनी संपूर्ण ट्विटर विकत घेण्याच्या सौद्यामुळे ट्विटरमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांची संख्या २५० टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, ट्विटरमध्ये आधीपासून काम करणारे नोकरदार चिंतेत आहेत. मध्यंतरी मस्क यांनी यासंबंधित ट्विटरवर भाष्य केलं होतं. मस्क म्हणाले होते की, ट्विटर विकत घेण्याचा व्यवहार पूर्ण झाला तर, सर्वात आधी कंपनी हार्डकोर सॉफ्टवेयर इंजिनीरयरिंग, डिझाइन, इन्फोसेक आणि सर्व्हर हार्डवेयर यांवर अधिक लक्ष केंद्रित करेल. टेक्निकल भागाचे सर्व मॅनेजर हे अव्वल दर्जाचे असले पाहिजेत, असेही मस्क यावेळी म्हणाले.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.