Russia Ukraine War Saam tv news
देश विदेश

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणणार, केंद्र सरकार विमानं पाठवणार

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

वृत्तसंस्था

Russia-Ukraine War:नवी दिल्ली: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने युक्रेनला विमानं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तयारीही सुरु आहे. तसेच, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या परतीचा खर्चही भारत सरकार उचलणार आहे. शुक्रवारी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भारत सरकार युक्रेनमधील भारतीयांसाठी उड्डाणे आयोजित करत आहे. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा संपूर्ण खर्च भारत सरकार उचलणार आहे.

दरम्यान, युक्रेन (Ukraine)मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, तेथील भारतीय दूतावासाने एक नवीन अॅडव्हायझरी जारी केली आहे आणि म्हटले आहे की भारत सरकार रोमानिया आणि हंगेरीमधून नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे (Russia) परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव्ह आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केल्याचा निषेध करण्यात आला. तसेच, संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत तणाव कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारत सर्व संबंधितांच्या संपर्कात आहे.

महाराष्ट्रातील हजारो लोक युक्रेनमध्ये अडकले

दरम्यान, महाराष्ट्रातील हजारो नागरिक आणि विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. त्यांची संपूर्ण माहिती केंद्राला पाठवण्यासाठी आणि त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. तर युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे पालक राज्य सरकारकडे त्यांच्या मुलांना परत आणण्यासाठी विनंती करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

SCROLL FOR NEXT