Dhanshri Shintre
पेट्रोल दरवाढीमुळे भारतीय ग्राहक आता अधिकाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सकडे वळत असून त्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे.
आजही अनेक लोकांना वाटते की इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये पुरेशी शक्ती नसते आणि त्या पारंपरिक वाहनांइतक्या सक्षम नाहीत.
अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स अशा प्रकारे डिझाइन केलेल्या असतात की त्या दोन व्यक्तींचे वजन सहजपणे पेलू शकतात.
तीन जणांचा भार घेणे शक्य असते, पण ते संपूर्णपणे इलेक्ट्रिक स्कूटरच्या वजन क्षमता आणि डिझाइनवर अवलंबून असते.
अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्सची वजन सहन करण्याची क्षमता सरासरी १२० ते १५० किलो दरम्यान असते.
OLA S1 pro, Ather 450X, TVS iQube यांसारख्या पॉवरफुल स्कूटर्सची वजन क्षमता १५० ते २०० किलोपर्यंत असते.
तीन व्यक्तींचे वजन १५०-१८० किलोपेक्षा जास्त असल्यास स्कूटरचा वेग, रेंज, संतुलन आणि परफॉर्मन्स कमी होतो.
चढ किंवा खराब रस्त्यांवर स्कूटरला सस्पेंशन आणि मोटरवर जास्त ताण येतो, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढते.