Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? योग्य देखभाल कशी करावी?

Dhanshri Shintre

इलेक्ट्रिक स्कूटर

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असून कमी खर्च आणि इंधन बचतीमुळे लोक त्यांना प्राधान्य देत आहेत.

बॅटरीचा टिकाऊपणा

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना बहुतांश लोकांच्या मनात बॅटरीचा टिकाऊपणा हा मोठा प्रश्न असतो.

किती वर्षे टिकते?

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचे आयुष्य सरासरी ५ ते ८ वर्षांचे असून ते विविध वापराच्या सवयींवर अवलंबून असते.

कोणती बॅटरी वापरली जाते?

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम-आयन (Li-ion) बॅटरी वापरली जाते, जी जास्त काळ टिकते, तर लीड-अ‍ॅसिड बॅटरी स्वस्त पण लवकर खराब होते.

ओव्हरचार्ज टाळा

बॅटरी वेळेपूर्वी चार्ज करणे आणि ओव्हरचार्ज टाळल्यास तिचे आयुष्य लांबवता येते.

बॅटरीची क्षमता

खडबडीत रस्ता, जास्त वजन आणि वेगामुळे बॅटरी ताणते, तर तापमानामुळे तिची क्षमता कमी होते.

किती कालावधी बॅटरी टिकते?

बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ४० ते १०० किलोमीटरपर्यंत चालते, हे मॉडेल आणि बॅटरी क्षमतेवर अवलंबून असते.

बॅटरी कधी बदलावी?

स्कूटरची रेंज कमी झाली, बॅटरी गरम होत आहे किंवा चार्ज थांबवल्यास, बॅटरी बदलण्याची गरज समजावी.

NEXT: भारतातील टॉप सेलिंग इलेक्ट्रिक कारची बॅटरी रेंज किती आहे? कारचे फायदे काय?

येथे क्लिक करा