Russia and Ukraine War Saam Tv
देश विदेश

Russia Ukraine War: युक्रेनचा दावा ! रशियाचे 30 टँक, 7 एयरक्राफ्ट, 6 हेलिकॉप्टर उद्धवस्त

रशिया- युक्रेन यांच्यामध्ये चांगलेच युद्ध पेटले आहे. युक्रेन संपूर्ण ताकदीनिशी रशियन हल्ल्यांचा प्रतिकार करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: रशिया- युक्रेन (Ukraine) यांच्यामध्ये चांगलेच युद्ध पेटले आहे. युक्रेन संपूर्ण ताकदीनिशी रशियन (Russian) हल्ल्यांचा प्रतिकार करत आहे. यामध्ये, युक्रेनच्या लष्कराचे कमांडर- इन- चीफ, व्हॅलेरी जालुझनी यांनी, आपण ३० रशियन टँक नष्ट केले आणि ७ विमाने आणि ६ हेलिकॉप्टर (Helicopter) पाडल्याचा दावा यांनी यावेळी केला आहे. एवढेच नाही, तर २५ रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सैन्यापुढे शरणागती पत्करल्याचे देखील जालुझनी यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी, युक्रेनचे सैन्य खेरसॉनला वाचविण्याकरिता लढत आहे, असे त्यांनी यावेळी म्हणाले आहेत. (russia ukraine conflict 30 russian tanks 130 armored vehicles 5 aircraft 6 helicopters destroyed)

हे देखील पहा-

यूक्रेनच्या उत्तरेकडे ग्लुखोव्ह आणि पोबेडा भागामध्ये युद्ध सुरू आहे. येथे रशियन (Russian) सैन्याला अडवण्यात आले आहे. शिवाय, चेर्निगोव्हच्या दिशेला बेलौस नदीच्या (river) काठावरती युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैन्याला अडवून ठेवण्यात आले आहे. तसेच, युक्रेनचे सैन्य डोवझंका, खार्किव, अख्तिरका आणि सुमी भागाचे रक्षण करत आहे. रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे १३७ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर ३१६ जण जखमी झाले आहेत, असा दावा युक्रेनचे राष्ट्रपती (President) वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी यावेळी केला आहे. रशिया विरुद्धच्या युद्धाकरिता युक्रेन सैन्याची जमवाजमव करत आहे.

रशिया विरुद्धच्या युद्धामध्ये युक्रेनला एकाकी सोडण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. या युद्ध जन्य परिस्थितीचा सामना करण्याकरीत युक्रेनच्या लष्कराने आपल्या नागरिकांना १० हजार असॉल्ट रायफल्स देखील वाटन्यात आले आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती कार्यालयाचे सल्लागार मायखाइलो पोडोलीक यांनी गुरुवारी, रशियन सैन्याने चेर्नोबिल अणु ऊर्जा प्रकल्पावर कब्जा केल्याचे सांगितले जात आहे. तसेच रशियाचा चेर्नोबिलवर कब्जा हा युरोपीयन देशाकरिता खूप मोठा धोका आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले होते.

रशिया- युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगात दिसून येत आहेत. आता तर खुद्द रशियामध्ये रशियाच्या या कारवाईचा विरोध होत आहे. या हल्ल्याविरोधामध्ये रशियाच्या वेगवेगळ्या शहरामध्ये लोक आंदोलन करत आहेत. तसेच लोक राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या या कारवाईवर टीका करत आहेत. या हल्ल्याचा विरोध करणारे लोक रशियाची राजधानी मॉस्कोसह ५३ इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. या आंदोलकांना रोखण्याकरिता रशियन पोलीस देखील तयार आहेत. स्थानिक माध्यमात वृत्तांनुसार, अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या १७०० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यातील बदनापुर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

Tesla Y Model Specification: टेस्लाचे सुपर फिचर्स आता भारतात, खास फिचर्स जाणून तुम्हीही व्हाल थक्क

सून बाथरूममध्ये आंघोळ करत होती, सासऱ्यानं मागून धरलं अन् बेडवर ढकललं; सासऱ्याचा खरा चेहरा समोर

CM Devendra Fadnavis: वरळी दहीहंडीतून फडणवीसांचा हल्ला; पापाची हंडी फुटली, विकासाची हंडी लागेल|VIDEO

Solapur News : एसीचा स्फोट आणि होत्याच नव्हतं झालं; सोलापुरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT