Russian AN-12 military cargo aircraft reportedly crashed near Yagunovo AI Image
देश विदेश

Plane Crash : हवेतच विमानाला आग, क्षणांत जमिनीवर कोसळून मोठा स्फोट; विमान दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

Russia Siberia Plane Crash Update News : रशियाच्या सायबेरियातील केमेरोवो परिसरात AN-12 लष्करी मालवाहू विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात विमानातील सर्व १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Alisha Khedekar

रशियाच्या सायबेरिया भागातून विमान अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. केमेरोवो परिसरात एक लष्करी मालवाहू विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात विमानातील सर्व १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे विमान एएन-१२ (AN-12) या प्रकारचे लष्करी मालवाहू विमान होते. मंगळवारी केमेरोवो शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या यागुनोवो गावाजवळ ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी विमानात एकूण १७ जण प्रवास करत होते. विमान कोसळल्यानंतर त्यातील एकाही व्यक्तीचा जीव वाचू शकला नाही. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

रशियातील वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका प्रत्यक्षदर्शीने अपघाताची माहिती दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, विमान हवेत असतानाच त्याला आग लागली होती. काही वेळातच विमानाचा तोल गेला आणि ते वेगाने जमिनीच्या दिशेने खाली येऊ लागले. त्यानंतर विमान थेट जमिनीवर कोसळले. जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र, विमानातील सर्व १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

केमेरोवोचे राज्यपाल इल्या सेरेदयुक यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे या विमान अपघाताची माहिती दिली. यागुनोवो परिसरात विमान कोसळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच आपण स्वतः घटनास्थळी रवाना होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्याची माहिती दिली. प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे राज्यपालांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी व्हिडिओतून अपघाताबाबत अधिक माहिती दिली. अपघात होण्यापूर्वी हे विमान या भागातून जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विमान कोसळण्यामागचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Quad क्वाड परिषदेतील PM मोदींच्या कृत्यानं जिंकली अनेकांची मने; VIDEO व्हायरल

Wednesday Horoscope : बोलताना संयम ठेवा! ५ राशींच्या व्यक्तींना कामाच्या नव्या संधी मिळतील; वाचा आजचे राशी

पंढरपूर हादरलं! शिवा संघटनेच्या अध्यक्षावर अज्ञातांकडून गोळीबार

IAS Transfer: IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल, कोणाची कुठे झाली पोस्टिंग?

Wednesday horoscope: नोकरी बदलण्याचा विचार करताय? 'या' राशींसाठी आजचा दिवस घेऊन येणार नवीन संधी

SCROLL FOR NEXT