Alisha Khedekar
ओरिजनल पैठणीमध्ये पदर आणि नक्षी दोन्ही बाजूंनी सुंदर दिसतात. मागील बाजूला डिझाइन फिकट किंवा छापल्यासारखे दिसत नाही.
खरी पैठणी हातमागावर विणलेली असल्याने तिच्या कापडात बारकाईने पाहिल्यास हाताने केलेल्या विणकामाची वेगळी ओळख जाणवते.
पैठणीचा पदर तिची खास ओळख आहे. ओरिजनल पैठणीची नक्षी कापडावर प्रिंट केलेली नसते, ती विणकामातून तयार केली जाते. मोर, कमळ, मुनिया किंवा पारंपरिक नक्षी अतिशय बारकाईने विणलेली असते.
पारंपरिक पैठणीमध्ये मुनिया बॉर्डरला विशेष महत्त्व आहे. पोपटासारखी दिसणारी ही नक्षी पैठणीच्या अस्सलपणाची महत्त्वाची खूण मानली जाते.अस्सल पैठणीचे रंग उठावदार असले तरी त्यात पारंपरिक सौंदर्य दिसते.
अस्सल पैठणीवर विशेष बारकोड देण्यात येणार आहे. तो स्कॅन केल्यांनतर खऱ्या पैठणीची ओळख होईल. तसेच येवल्याच्या ओरिजनल पैठणीवर विशिष्ट प्रकारचा लोगो पाहायला मिळेल त्यावरून खरी आणि बनावट पैठणीची ओळख होईल
पैठणी महाराष्ट्राची भौगोलिक ओळख असलेली पारंपरिक साडी आहे. खरेदी करताना विक्रेत्याकडून प्रमाणपत्र आणि उत्पादनाची माहिती नक्की विचारा.
अस्सल पैठणीतील जरी उठावदार आणि टिकाऊ असते. स्वस्त किंवा कृत्रिम जरीपेक्षा तिची चमक आणि पोत सहज वेगळा जाणवतो.