Smoke engulfs Kyiv ministry building after Russia’s biggest drone and missile strike. saam tv
देश विदेश

Russia- Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; टार्गेटवर कीवमधील मंत्री, कॅबिनेट इमारतीतून उठले धुरांचे लोट

Russia Launches Largest Drone Attack : रशियाने युक्रेनच्या मंत्रालयाच्या इमारतींना लक्ष्य करून कीववर सर्वात मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. मंत्रिमंडळाच्या परिसरात धुराचे लोट पसरलाय. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

  • रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला.

  • कीवमधील मंत्रालयाच्या इमारतीला टार्गेट करण्यात आलं.

  • या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू, त्यात एका वर्षाच्या मुलाचाही समावेश.

मागील काही वर्षांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध होतंय. या दोन देशातील युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. परंतु हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय. यावेळी रशियाच्या टार्गेटवर युक्रेनचे मंत्री होते. या हल्लात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

रशियाने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी कीववर मोठ्या प्रमाणात हल्ला केलाय. या हल्ल्यानंतर कीवमधील कॅबिनेट इमारतीच्या छतावरून धूरही निघताना दिसत. हा धूर हल्ल्यामुळे दिसला की इतर काही कारणाने बाहेर पडत होता हे समोर आलेले नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, कीव शहर प्रशासनाचे प्रमुख तैमूर तकाचेन्को यांनी या हल्ल्याबद्दल माहिती दिलीय. मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.

मुलाचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलंय. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को म्हणाले की, रशियाने सोडलेल्या ड्रोनचा ढिगारा स्वियाटोशिंस्की जिल्ह्यातील एका निवासी इमारतीवर आणि कीवच्या डार्नित्सकी जिल्ह्यातील एका इमारतीवर पडला. या हल्ल्यात १० हून अधिक लोक जखमी झालेत. रशियाने सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत १३०० हून अधिक ड्रोन हल्ले केलेत, असा आरोप युक्रेनने केला होता. याशिवाय ९०० गाईडेड एरियल बॉम्ब आणि ५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आलीत.

एका पत्रकाराने या हल्ल्याची दाहकता किती होती हे सांगितलंय, असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांनी रशियाच्या हल्ल्यानंतर कीवच्या कॅबिनेट इमारतीच्या छतावरून धुराचे लोट उठताना पाहिले. हल्ल्यामुळे इमारतीला आग लागली होती इतर कारणामुळे धुराचे लोट उठले होते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रशियाने आतापर्यंत शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यापासून परावृत्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT