Parle-G Price Saam tv
देश विदेश

Parle-G Price : भारतात ५ रुपयांना, पाकिस्तान-अमेरिकेत महाग; पार्ले-जी ची किंमत किती आहे माहितेय का ?

Know The Parle G Biscuit Price : देशाच्या कानाकोपऱ्यात पार्ले जी बिस्किट पोहोचले आहे. या बिस्किटाची चव गरीब व श्रीमंत प्रत्येकांने चवीने चाखली असणार.

कोमल दामुद्रे

Parle-G Biscuit Price In World : भारतातील प्रत्येक घरात पार्ले-जीची चव प्रत्येकांने चाखली असेलच. कधी चहा-दुधात बडवून तर कधी पाण्यात भिजवून. देशाच्या कानाकोपऱ्यात पार्ले जी बिस्किट पोहोचले आहे. या बिस्किटाची चव गरीब व श्रीमंत प्रत्येकांने चवीने चाखली असणार.

आजही अनेकांची सकाळही पार्ले-जीच्या बिस्किटाशिवाय अपूर्ण आहे. भारतात (India) २ रुपयांना मिळणारे पार्ले-जी कालातंराने ५ रुपयांवर आले. पण त्याची चव व त्याची क्रेझही आजही अनेकांच्या मनात स्वत:च स्थान टिकवून आहे. परंतु हेच पार्ले-जी बिस्किट परदेशातही अंत्यत लोकप्रिय आहे.

1. पार्ले-जी ची सुरुवात कुठून झाली ?

पार्ले-जी सुरुवात मुंबईतील (Mumbai) विलेपार्ले या भागातून झाली. बंद पडलेल्या फॅक्टरीला जणू सोन्याचे दिवसचं आले व हा लोकप्रिय बँड झाला. व्यापारी मोहनलाल दयाल यांना ही बंद पडलेल्या फॅक्टरी १९२९ मध्ये खरेदी (Shop) केले. त्यानंतर पार्ले नावाने ब्रँडची सुरुवात झाली. १९३८ मध्ये पार्ले-ग्‍लूको (Parle-Gloco) नावाने बिस्किटाचे उत्पादन सुरु करण्यात आले.

2. अचानक पार्ले-जी बिस्किट का बंद झाले ?

स्वातंत्र्यानंतर या बिस्किटाचे उत्पादन बंद झाले. बिस्किट तयार करण्यासाठी गव्हाचा वापर होत होता. गव्हाचे उत्पादनच कमी झाल्याने आणि इतर देशातून गव्हाचा पुरवठा न झाल्याने या बिस्किटाचे उत्पादन थांबविण्यात आले.

3. Gloco ला Parle-G नाव कसे मिळाले ?

पुन्हा एकदा कंपनीने उत्पादन सुरु केले तेव्हा बाजारात अनेक कंपन्यांनी तीव्र स्पर्धा केली. त्यावेळी ब्रिटानिया कंपनीच्या ग्लूकोज-डी बिस्किटाने मार्केटमध्ये आपले नाव कमावले होते. त्यामुळे पार्ले कंपनीने ग्लूको बिस्किटाचे नाव बदलून Parle-G असे बिस्किट पुन्हा नव्याने बाजारात आणले. १९८० नंतर पार्ले ग्लूको बिस्किटाचा आकार अधिक लहान करण्यात आला. सन २००० मध्ये कंपनीने G अर्थ Genius या टॅगलाईनचा वापर करत बिस्किटाला बाजारात रिलॉन्च केले.

4. अमेरिका व पाकिस्तानात किती आहे किंमत ?

भारतात मिळणाऱ्या पार्लेजीच्या 5 रुपयांच्या पॅकेटचे वजन 65g आहे. तर रिपोर्टनुसार, अमेरिकेतील 1 डॉलरच्या पार्ले जीचे 56.5g चे 8 पॅक येतात. याचा हिशोब केल्यास हा पुडा 10 रुपयांच्या जवळपास मिळतो. याशिवाय बकाल, पाकिस्तानाचा विचार केल्यास सध्या आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी तिथे पार्ले-जीची किंमत 50 रुपये आहे. Grocer App नुसार, पार्लेजीच्या 79g पॅकची किंमत 20 रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईच्या आफताबसह ८ जणांच्या मुसक्या आवळल्या, दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, राजधानीत अलर्ट

Maharashtra Live News Update : नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

Jan Suraksha Bill : जन सुरक्षा कायद्याला विरोध; राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, कायदा रद्द करण्याची मागणी

iPhone Air Launch: Apple चा नवा धमाका! आतापर्यंतचा सर्वात स्लिम स्मार्टफोन बाजारात, भारतातील किंमत वाचून व्हाल थक्क

Gym Hygiene : जिममधील उपकरणांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT