Rs 2000 Notes : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भाजप खासदार सुशील मोदी यांनी २००० रुपयांच्या नोटेचा चलनात तुटवडा निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. काळ्या पैशांच्या रुपानं दोन हजार रुपयांच्या नोटेचा साठा करण्यात येत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. केंद्रानं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांच्या बैठकीत हा मुद्दा स्पष्ट करण्याची मागणीही मोदी यांनी केली.
काळ्या पैशांवर अंकुश लावण्यासाठी नोटबंदी करा, असेही ते म्हणाले. बँकांना दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्यापासून रोखण्याचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मागील फेब्रुवारीत स्पष्ट केले होते. (Latest Marathi News)
राज्यसभेत चर्चा करताना भाजप खासदार सुशील मोदी यांनी दोन हजारांच्या नोटांच्या मुद्द्यावर चर्चा केली. दोन हजाराची नोट म्हणजे काळा पैसा. तसेच दोन हजाराची नोट म्हणजे साठेबाजी. जर देशात ब्लॅक मनी रोखायचा असेल तर दोन हजारांची नोट बंद करावी लागेल. २००० च्या नोटेच्या वितरणाचं आता काही औचित्य नाही. टप्प्याटप्प्याने दोन हजाराच्या नोटा चलनातून कमी करायला हव्यात, अशी माझी केंद्र सरकारला विनंती आहे, असे मोदी म्हणाले. (National News)
एका कार्यक्रमात माजी सचिव एस. सी. गर्ग म्हणाले होते की, दोन हजारांची नोट बंद केली पाहिजे. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांच्या जागी दोन हजारांच्या नोटांची आता साठेबाजी केली जात आहे आणि ती बंद केली पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. काळ्या पैशांवर अंकुश लावणे, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाउल टाकणे हा यामागचा उद्देश होता.
नोटांची छपाई बंद
सरकारी माहितीनुसार, काही वर्षांनी भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. मात्र, अजूनही २००० हजारांची नोट चलनात आहे. हळूहळू २००० ची नोट चलनातून बंद करण्यात येण्याची शक्यता आहे.
२०१६ मध्ये नोटबंदीची घोषणा
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटबंदीची घोषणा केली होती. त्याच मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर पाचशेची नवी नोट चलनात आली. एक हजाराच्या नोटेऐवजी दोन हजारांची नोट चलनात आली. नोटबंदीमुळं काळा पैसा आणि दहशतवादाला चाप लागेल, असं म्हटलं गेलं होतं. आता भाजप खासदारानंच दोन हजारांची नोट चलनातून बाद करा अशी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.