RISHIKESH-KARNAPRAYAG RAIL PROJECT saam tv
देश विदेश

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

125-Km Rishikesh-Karnaprayag Railway Line: उत्तराखंडमधील ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाची खास वैशिष्ट्यं जाणून घ्या. १२ स्थानकं, २८ बोगदे, ५७ पूल आणि ८३ टक्के बोगद्यातून जाणारा रेल्वेमार्ग चर्चेत.

Omkar Sonawane

उत्तराखंडमधील गढवाल हिमालयात उभारण्यात येत असलेला ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्ग धार्मिक पर्यटन आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. सुमारे १२५ किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग ऋषिकेशला कर्णप्रयागशी जोडणार आहे. या प्रकल्पात १२ रेल्वे स्थानकं, २८ मुख्य आणि आपत्कालीन बोगदे तसेच ५७ मोठ्या आणि लहान पुलांचा समावेश आहे. या मार्गाचा सुमारे ८३ टक्के भाग बोगद्यांमधून जाणार आहे. त्यामुळे डोंगराळ भागातील रेल्वे संपर्क सुधारण्यासोबतच केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेसाठी पुढील प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाचा मुख्य उद्देश गढवाल हिमालयातील अंतर्गत भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडणे हा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऋषिकेश ते कर्णप्रयागपर्यंत रेल्वेने प्रवास करता येणार आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यास आणि प्रवाशांची ये-जा अधिक सोपे होण्यास मदत मिळू शकते.

या प्रकल्पाचं महत्त्व केवळ धार्मिक पर्यटनापुरतं मर्यादित नाहीये. रेल्वेचे जाळे सुधारल्यामुळे स्थानिक नागरिक, कामगार आणि मालवाहतुकीलाही फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच पर्यटनाशी संबंधित व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.

२८ बोगदे आणि ५७ पुलांची उभारणी

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, हिमालयातील दुर्गम आणि उंचसखल भागात रेल्वेमार्ग उभारणं हे मोठं आव्हान आहे. या प्रकल्पाचा सुमारे ८३ टक्के भाग बोगद्यांमधून जाणार आहे. यामध्ये २८ मुख्य आणि आपत्कालीन म्हणजेच एस्केप बोगद्यांचा समावेश आहे. तसेच ५७ मोठे आणि लहान पूल बांधले जात आहेत. डोंगराळ भूभागात रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. या मार्गावर उंच पर्वतरांगा, खोल दऱ्या आणि गुंतागुंतीची भूगर्भीय परिस्थिती असल्याने बांधकाम अधिक आव्हानात्मक ठरत आहे.

केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेला मिळणार चालना?

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वेमार्गामुळे उत्तराखंडमधील प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी दळणवळणाची सुविधा सुधारण्याची अपेक्षा आहे. ऋषिकेशहून रेल्वेने कर्णप्रयागपर्यंत पोहोचल्यानंतर भाविकांना पुढील प्रवास रस्तेमार्गे करावा लागणार आहे. त्यामुळे यात्रेच्या एका टप्प्यात रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊन प्रवास अधिक सोयीस्कर होऊ शकतो.

धार्मिक पर्यटनाला चालना मिळाल्यास हॉटेल, वाहतूक, स्थानिक दुकाने आणि इतर पर्यटनाशी संबंधित व्यवसायांनाही फायदा होण्याची शक्यता आहे.

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प हा उत्तराखंडमधील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. सुमारे १२५ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग, १२ स्थानकं, २८ बोगदे आणि ५७ पुलांचा समावेश असलेला हा प्रकल्प हिमालयातील कठीण परिस्थितीत उभारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT