केरळ : एक 56 वर्षीय रिक्षा चालकाला एक दिवस 12 कोटी रुपयांची लॉटरी मिळेल असे कधीच वाटले नसेल. लोक ज्याला 'ऑटो वाले भैया ...' म्हणत असत त्यांना आज संपूर्ण केरळ त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आतुर झालं आहे! त्या रिक्षाचालकाचे नाव जयपालन आहे, ते कोचीजवळील माराडू येथे आपल्या 95 वर्षांच्या आई, पत्नी आणि दोन मुलांसह राहतात.
ते अश्या गरीब कुटुंबातून येतात ज्या कुटुंबाने कठोर परिश्रम केले आणि आपल्या मुलांना सुवर्ण भविष्य दिले. मात्र, आता त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. आता कोट्यवधींचे मालक झाल्यानंतर, त्याला अनेक स्वप्ने आहेत जी पूर्ण होणार आहेत.
हे देखील पहा-
जयपालन ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचे पोट भारतात. तथापि, आता ते 12 कोटी रुपयांच्या ओणम बंपर लॉटरी'चा विजेते झाले आहेत.
जयपालन यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना टीव्हीद्वारे बंपर बक्षीस जिंकणाऱ्या लॉटरी क्रमांकाबद्दल कळले तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती. अहवालानुसार, सोमवारी सकाळी जयपालनने कॅनरा बँकेच्या पल्लीनाडा शाखेत तिकीट जमा केले, त्यानंतर त्याने बंपर लॉटरी जिंकल्याची बातमी व्हायरल झाली.
जयपालन म्हणाले, दरवर्षी 'ओणम बंपर तिकिटे' खरेदी करत होतो. ते म्हणाले, "मी साधारणपणे प्रत्येक वेळेस फक्त एक बंपर तिकीट खरेदी करतो आणि यावेळी नशीबाने मला अनुकूल केले." कुटुंब या रकमेचा काही भाग घर बांधण्यासाठी आणि त्याचे कर्ज फेडण्यासाठी खर्च करणार आहे.
रविवारी घोषित झालेल्या निकालाचा विजेता जयपालनचा लॉटरी तिकीट क्रमांक - टीई 645465 आहे - जो त्यांनी 10 सप्टेंबर रोजी त्रिपुनीथुरा येथील मीनाक्षी लॉटरीमधून खरेदी केला होता. एकूण 12 कोटींपैकी 10 टक्के एजन्सी कमिशन म्हणून जाईल. कर कापल्यानंतर त्यांना 7.39 कोटी रुपये मिळतील.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.