India-Pakistan War Saam Tv News
देश विदेश

india pakistan Conflict : अमेरिकेची मध्यस्थी, चीनचा दबाव, पाकिस्तानचं नुकसान; शस्त्रसंधीनंतर भारताने काय करावं? VIDEO

india pakistan ceasefire : शस्त्रसंधीनंतर भारताने काय करावं, याबाबत निवृत्त हेमंत महाजन यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवण्यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी केली. दोन्ही देशांत युद्धविराम होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी लागू होण्यासाठी पुढाकार घेतला. या शस्त्रसंधीसाठी चीनकडूनही दबाव असल्याची माहिती मिळत आहे. या घडामोडीवर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी भाष्य केलं आहे.

निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले, 'आज दुपारी ३.३० वाजता डीजीएमओ यांना भारताच्या डीजीएमओ यांना फोन केला. त्यांचा एअर डिफेन्स उध्वस्त झाला होता. तसेच चीनने सुद्धा दबाव टाकला होता. अमेरिकेने सुद्धा वक्तव्य केलें आहे की, येथून पुढे जर काही कृती त्यांनी केली तर आम्ही लक्ष देऊ. पाकिस्तानचे नुकसान झालं आहे. पाकिस्तान धोकादायक आहे, त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवर लक्ष ठेवायला लागेल. दहशतवादी कृत्य ते करणार नाहीत, यावर लक्ष ठेवायला लागेल'.

'भारताने आक्रमक क्षमता वाढवयला हवी. शस्त्रसंधी झाली आहे, पण ही किती वेळ टिकते हे पाहावं लागेल. पाकिस्तानचा एअर डिफेन्स उध्वस्त झाल्याने त्यांनी माघार घेतली. चिनी उपकरणे यांची कार्यक्षमता कमी पडली. अमेरिकेच्या पाठोपाठ चीनकडून सुद्धा पाकिस्तानवर दबाव आहे. Act of terror म्हणजे act of war हे आपण जाहीर केलं आहे. पाकिस्तान विश्वासघातकी देश असून आपल्याला लक्ष द्यावं लागेल. शस्त्रसंधी टीकेल तोपर्यंत आपल्याला आपली ताकद वाढवावी लागेल. ट्रम्प आपले मित्र आहेत. चीन, पाकिस्तानपेक्षा त्यांचे आपल्यावर प्रेम नक्कीच जास्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव टाकला पाहिजे की, आता बाय लॅटरल करारावर सही करा, असे ते म्हणाले.

'अमेरिकेने ४ गोष्टी आपल्याला द्यायला हवी. त्यांच्याकडून ई-इंजिन हवी आहे, जे आपल्या विमानात वापरले जाईल. तंत्रज्ञानांची त्यांनी मदत आपल्याला करायला हवी. गुप्तचर यंत्रणामध्ये वापरण्यात येणारी उपकरणाबाबत त्यांनी मदत करायला पाहिजे. ३० हजार कोटी रुपयांचे ड्रग्स आपल्याकडे पाकिस्तानातून आले आहेत, हे ड्रग्स वॉर थांबले पाहिजे. बांगलादेशी घुसखोर घातक आहेत. पाकिस्तानातून भारतात खोट्या नोटा येतात ते थांबल्या पाहिजे. २ बांगलादेशी दहशतवादी पश्चिम बंगालमध्ये पकडले आहेत. पाकिस्तानचे सेल १५० ते २०० यांनी काही कृती करायला नको, याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. दहशतवादाचे स्वरूप बदलत चालले आहे, असे महाजन पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT