Viral Saam
देश विदेश

Viral: एका रात्रीसाठी महिला अर्धा बेड देतेय रेंटवर, बाजूला कुणीही झोपू शकतं, अट फक्त ही एकच

Canadian Woman Rents Out Half Her Bed for Extra Income: कधी घर, गाडी किंवा दुकान भाड्याने दिल्याचं आपण ऐकलं असेल, पण अर्धा बेड भाड्याने दिल्याचं ऐकलं आहे का? कॅनडामधील ३७ वर्षीय मोनिक जेरेमिया या महिलेने ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.

Bhagyashree Kamble

आतापर्यंत घर, गाडी आणि दुकान भाड्याने दिलेलं आपण ऐकलं असेल, पण कधी झोपण्यासाठी अर्धा बेड भाड्याने दिल्याचं कुणी ऐकलं आहे का? एका महिलेनं अतिरिक्त उत्पन्नाबद्दल माहिती देताना, अनोळखी व्यक्तींना अर्धा बेड देत असल्याची माहिती दिली. लॉकडाऊनमध्ये पैशांची तीव्र टंचाई जाणवत होती. यादरम्यान, पैसे कमवण्याचा मार्ग शोधला आणि तिने अर्धा बेड भाड्याने देण्याचे ठरवले. तिने अर्धा बेड झोपण्यासाठी देऊन चांगलेच पैसे कमावले आहेत.

मोनिक जेरेमियाने असं ३७ वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला कॅनडामधील रहिवासी आहे. लॉकडाऊनमध्ये तिला पैशांची तीव्र टंचाई भासत होती. यादरम्यान, तिचा ब्रेकअपही झाला होता. अशा परिस्थितीत तिने पैसे कमवण्याचा नवीन मार्ग शोधला. तिने अर्धा बेड भाड्याने देण्याचे ठरवले. कोरोना काळात काहींकडे खाण्यासाठी पैसे नव्हते, तर काहींकडे राहण्यासाठी डोक्यावर छप्पर नव्हतं. यावेळी महिलेनं अर्धा बेड भाड्याने देण्याचं ठरवलं.

यासाठी महिलेने एक ऑनलाइन पोस्ट केली. या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पोस्ट पाहून अनेकांनी तिच्याशी संपर्क साधला. या महिलेनं अर्धा बेडचा भाग देऊन चांगलेच पैसे कमावले आहेत.

मोनिक या महिलेनं सांगितलं की, 'लॉकडाऊन दरम्यान उत्पन्नाचे सगळे स्त्रोत अचानक बंद झाले. कॅनडामध्ये राहणं परवडत नव्हतं. याकाळात ब्रेकअपही झालं होतं. पण मग युक्ती सुचली. कोरोना काळात अनेक जण बेघरही झाले होते. मग झोपण्यासाठी अर्धा बेडचा भाग भाड्याने देण्याचे ठरवले. यासंदर्भात पोस्ट केली, आणि पोस्टला विशेष प्रतिसादही मिळत गेला. महिन्याला पन्नास हजार रूपये अतिरिक्त कमाई करण्यास सुरूवात झाली. याला हॉट बेडिंग असंही म्हटलं जातं', असं महिलेनं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

IAS Transfer: तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली, आता कुठे करण्यात आली नियुक्ती?

पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट', video

psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

SCROLL FOR NEXT