JioMart Layoff
JioMart Layoff Saam Tv
देश विदेश

JioMart Layoff: रिलायन्सच्या JioMart ने 1000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ, आणखी लोकांवर कपातीची टांगती तलवार

Priya More

Reliance JioMart: जगावर सध्या आर्थिक मंदीचे (Economic Recession) सावट आहे. या मंदीचा फटका जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांसोबत लहान-मोठ्या कंपन्यांना देखील बसत आहे. या कारणामुळे एकापाठोपाठ एक कंपनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जिओमार्टने (JioMart) कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय घेतला आहे. जिओ मार्टने आपल्या 1000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. तसंच आणखी काही कर्मचाऱ्यांना देखील कंपनी कामावरुन काढून टाकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार आहे.

जिओ मार्टने कर्मचारी कपातीचा निर्णय नुकत्याच विकत घेतलेल्या मेट्रो कॅश अँड कॅरी या कंपनीचा ताबा घेतल्यानंतर घेतला आहे. जिओमार्ट पुढील काळात आणखी कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. भविष्यात कंपनी 9000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिओमार्टच्या या निर्णयामुळे कर्चमाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

जिओमार्टने नुकतेच मेट्रो कॅश अँड कॅरीचे अधिग्रहण केले आहे. त्यानंतर कंपनीने कर्मचारी कपातीबाबतचा मोठा निर्णय घेतला. कंपनी या निर्णयाच्या माध्यमातून नफा वाढवण्याचा आणि खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या काळात जिओमार्टमध्ये 15 हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. त्यापैकी दोनतृतीयांश कर्मचाऱ्यांची छाटणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

अशा परिस्थितीत हजारो कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. रिलायन्स रिटेलने अद्याप या प्रकरणावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. आपला खर्च भागवण्यासाठी कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत असल्याचे बोलले जात आहे. जिओमार्टने गेल्या काही दिवसांत आपल्या कॉर्पोरेट कार्यालयातील 500 हून अधिक कर्मचाऱ्यांसह एकूण 1,000 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

यासोबतच कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना छाटणीसाठी परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅनवर ठेवले आहे. अशा परिस्थितीत या माध्यमातून कामगिरीच्या आधारे कंपनी पुढील कर्मचारी कपातीबाबत नियोजन करू शकते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT