देश विदेश

IPL 2023 : JioCinema वर IPL पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी; आता पैसे मोजून घ्यावं लागेल सबस्क्रिप्शन; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Satish Kengar

Jiocinema Subscription for Ipl: जर तुम्हीही 'आयपीएल'च्या या हंगामाचा आनंद JioCinema वर घेत असाल, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. आता तुम्हाला JioCinema वरील प्रत्येक कंटेंटसाठी सबस्क्रिप्शन चार्ज भरावा लागणार आहे. जिओ सिनेमा आयपीएलच्या अखेरीस सबस्क्रिप्शन सेवा सुरू करू शकते.

या संदर्भात ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, रिलायन्सच्या मीडिया आणि कंटेंट व्यवसायाच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जिओ सिनेमा आपल्या विस्तारानंतर सबस्क्रिप्शन सेवा करेल. किमतीबाबत अद्याप रणनीती ठरलेली नसली तरी लवकरच याबाबत निर्णय होईल. पुढील महिन्यात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट संपण्यापूर्वी नवीन सेवा सुरु केली जाईल. तोपर्यंत प्रेक्षक मोफत सेवेचा आनंद घेऊ शकतात.

चित्रपट पाहण्यासाठीही मोजावे लागणार पैसे

आयपीएलनंतर जिओ चित्रपट पाहण्यासाठीही सबस्क्रिप्शन चार्ज लागू केला जाऊ शकतो. यासाठी किती शुल्क आकारला जाईल, याबाबत जिओ सिनेमा लवकरच निर्णय घेईल.(Latest Marathi News)

मुकेश अंबानी आपला हा प्लॅटफॉर्म ग्लोबल मीडिया आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग जायंट बनण्यासाठी तयार करत आहेत. हे पाहता गेल्या वर्षी Viacom18 Media Pvt ने IPL चे डिजिटल राइट्स विकत घेतले. यानंतर अंबानींनी ते मोफत दाखवण्याची सुरुवात केली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात याकडे प्रेक्षक आकर्षित झाले.

जिओ सिनेमावर रेकॉर्ड व्ह्यूज

दरम्यान, इंटरनेटच्या वाढत्या अॅक्सेसमुळे भारतातील प्रेक्षकांची संख्या ही भली मोठी प्रचंड आहेत. JioCinema ने एप्रिलमध्ये IPL च्या सुरूवातीला 1.47 अब्ज पेक्षा जास्त व्हिडीओ व्ह्यूज आणि बुधवारी एका सामन्यासाठी 22 मिलियन्स व्ह्यूज मिळवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Calcium Foods : दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम असलेले पदार्थ; लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल अन् हाडं होतील मजबूत

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Buldhana: ज्वारी खरेदीच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप, नोंदणी कार्यालयात तुडुंब गर्दी

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Benifits of Pomogranate Peel: डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देताय का? जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT