Bhopal Ravan Dahan Video Saam Tv
देश विदेश

Shocking: अरेरे काय हे! सकाळीच रावणाचं दहन, लपून आले अन् पुतळा दिला पेटवून; मंत्री येण्यापूर्वीच..., पाहा VIDEO

Bhopal Ravan Dahan Video: भोपाळमध्ये सकाळीच रावणाचे दहन झाल्याची घटना समोर आली. संध्याकाळी रावणाचे दहन केले जाते पण सकाळी अचानक काही तरुण-तरुणींनी रावणाचा पुतळा पेटवून दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • भोपाळमध्ये दसऱ्याच्या दिवशी सकाळीच रावणाचे दहन झाले.

  • नशेत असलेल्या तरुण-तरुणींनी हे कृत्य केले.

  • मंत्री महोदय कार्यक्रमाला यायच्या आधीच पुतळा पेटवला गेला.

  • घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये दसऱ्याच्या दिवशी म्हणजे आज सकाळी चकीत करणारी घटना घडली. भोपाळमध्ये सकाळीच रावणाचे दहन करण्यात आले. सगळीकडे संध्याकाळी रावणाचे दहन होते. पण सकाळी रावणाचे दहन झाल्यामुळे सर्वजण चकीत झाले. रावणाच्या दहन कार्यक्रमासाठी मंत्री महोदय उपस्थित राहणार होते. पण त्याचपूर्वी नशेमध्ये असणाऱ्या तरुण-तरुणींनी आज सकाळीच ६ वाजताच रावणाचा पुतळा पेटवून दिला.

ही धक्कादायक घटना बाग मुगालिया ग्राऊंडमध्ये घडली. या ठिकाणी दसरा उत्सवासाठी भल्यामोठा रावणाचा पुतळा तयार करण्यात आला होता. दहनाच्या नियोजित वेळेनुसार काही तरुण आणि तरुणींनी दारूच्या नशेत रावणाचा पुतळा पेटवून दिला. त्यानंतर लाल रंगाच्या कारमधून त्यांनी पळ काढला. रावण पेटवून दिल्यानंतर फटाक्यांचे आवाज ऐकून सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत संपूर्ण पुतळा जळून खाक झाला होता.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, लाल रंगाच्या कारमधून काही तरुण-तरुणी आले होते. ते दारूच्या नशेत होते. त्यांनी जाणूनबुजून हे कृत्य केले. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेमुळे दसऱ्याचे पारंपारिक आणि धार्मिक महत्व देखील प्रभावित झाले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सध्या तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT