Tata Steel Manager Commits Suicide with Family Saam Tv News
देश विदेश

Tata Steel Manager : मुंबईहून घरी परतले, टाटा स्टीलच्या मॅनेजरनं आपल्या कुटुंबासह आयुष्य संपवलं; नातेवाईकांवर शोककळा

Tata Steel Manager Commits Suicide with Family : कृष्ण कुमार आदित्यपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चित्रगुप्त नगरात वास्तव्यास होते. त्यांच्या कुटुंबातील कोणीच बराच वेळ बाहेर न दिसल्यानं आसपास राहणाऱ्यांना शंका आली.

Prashant Patil

रांची : टाटा स्टील कंपनीचे वरिष्ठ मॅनेजर कृष्ण कुमार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. पत्नी डॉली देवी आणि दोन लेकींसह कृष्ण कुमार यांनी राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यात घडली.

कृष्ण कुमार आदित्यपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चित्रगुप्त नगरात वास्तव्यास होते. त्यांच्या कुटुंबातील कोणीच बराच वेळ बाहेर न दिसल्यानं आसपास राहणाऱ्यांना शंका आली. त्यांनी याची माहिती आदित्यपूर पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलीस दाखल झाले. त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. आतील चित्र पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. कुटुंबातील चारही जण गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले.

कृष्ण कुमार यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कर्करोग झाला होता. काही दिवसांपूर्वीच ते मुंबईला उपचारांसाठी येऊन गेले होते. इथल्या डॉक्टरांनी त्यांना केमोथेरेपीचा सल्ला दिला होता. कृष्ण कुमार यांचं वास्तव्य असलेल्या जमशेदपूरमध्ये केमोथेरेपी सुविधा असल्यानं १९ मे रोजी कृष्ण कुमार माघारी परतले. कृष्ण कुमार केमोथेरेपी करुन घेणार होते. त्यासाठी त्यांना रुग्णालयाचं दाखल व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी कंपनीत अर्ज देखील केला होता.

उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच कृष्ण कुमार यांनी पत्नी डॉली देवी आणि दोन मुलींसह आत्महत्या केली. त्यांनी गळफास लावून घेतला. पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकानं कृष्ण कुमार यांच्या घरातील पुरावे गोळा करुन तपास सुरु केला आहे. हे प्रकरण प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येचं वाटत आहे. पण पोलीस अद्याप शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. कर्करोगाचं निदान झाल्यापासून कृष्ण कुमार तणावाखाली होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Sharma : अभिषेक शर्माकडून सर्वात मोठी चूक, मॅच विनर खेळाडूचा सोप्पा कॅच सोडला, सूर्याची रिअॅक्शन व्हायरल

Iran Dron Attack On Dubai: इराणकडून दुबईत ड्रोन हल्ले, उंच इमारतीला भीषण आग; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बाजारपेठांमध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त खरेदीची लगबग

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या निवडणुकीआधी भाजपचा विलीनीकरणाचा डाव; मित्रपक्षाची डोकेदुखी वाढली

Konkan Tourism : शिमग्याला कोकणात गेलाय; मग 'हे' Hidden लोकेशन निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

SCROLL FOR NEXT