Ayodhya Ram Navami Celebration
Ayodhya Ram Navami Celebration ANI/Twitter
देश विदेश

Ayodhya News: अयोध्येत रामनवमीचा उत्साह, शरयू नदीवर रामभक्तांची गर्दी; दर्शनासाठी लांबच लांब रांगा

Satish Daud-Patil

Ayodhya Ram Navami Celebration

तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज रामनवमी साजरी होत आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच राम मंदिर परिसरात भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. (Breaking Marathi News)

शरयू नदीत स्नान करुन रामभक्त रामल्लाचे दर्शन घेत आहेत. रामनवमीनिमित्त अयोध्येत बुधवारी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. राम की पैडी, रामकोट, सरयू बीच, धरमपथ, रामपथसह रामजन्मभूमी संकुलात पुष्पवृष्टी करून रामनवमी साजरी केली जाणार आहे.

प्रभू श्रीरामांचा (Ram Mandir) ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. अयोध्येत दाखल होणाऱ्या सर्व रामभक्तांसाठी योग्य त्या सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आज प्रभू श्रीरामाच्या कपाळावर जेव्हा सूर्याची किरणे पडतील, तेव्हा सुवर्ण वातावरणात प्रभूरामाचा राजतिलक होणार आहे. (Latest Marathi News)

रामजन्मोत्सवाच्या दिवशी भाविकांना रामललाचे दर्शन घेता यावे यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दर्शनाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पहाटे साडेतीन वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनाची रांग खुली करण्यात आली आहे. पहाटे ५ वाजता शृंगार आरती झाली असून रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

यानंतर प्रसंगानुसार भोग व शयन आरती होणार आहे. रामनवमीला शयन आरती झाल्यानंतर मंदिरातून बाहेर पडताना प्रसाद मिळणार आहे. भाविकांनी त्यांचे मोबाईल फोन, शूज, चप्पल, मोठ्या पिशव्या आणि प्रतिबंधित वस्तू इत्यादी मंदिरापासून सुरक्षितपणे दूर ठेवाव्यात, असं आवाहन करण्यात आलंय. अयोध्येत सध्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

SCROLL FOR NEXT