Ram mandir murti photo hd Saam TV
देश विदेश

Ram Mandir News: अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज विराजमान होणार रामलल्ला; संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

Ram Mandir Ayodhya: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.

Satish Daud

Ayodhya Ram Mandir Marathi News

संपूर्ण रामभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस आज उजडला आहे. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, या सोहळ्याला मंदिराच्या गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती प्रामुख्याने असणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी राजकारणातील दिग्गज नेते, कलाकार मंडळी तसेच हजारो रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील वैदिक विद्वान या महोत्सवाची पूजा करतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते श्रीरामांची मूर्ती मंदिरात विराजमान केली जाईल. दुपारी १२ वाजेपासून आज दिवसभर हा सोहळा पार पडेल. त्यानंतर मंगळवारी २३ जानेवारीला प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा समारोप होईल.

त्यानंतर देशभरातील रामभक्तांना प्रसादाचं वाटप केलं जाईल. बुधवार २४ जानेवारी २०२४ पासून राम मंदिर सर्व रामभक्तांसाठी खुलं होईल. देशातील तमाम रामभक्तांना प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येईल. भाविकांना ये-जा करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अयोध्येत रस्त्यांचं रुंदीकरण देखील करण्यात आलं आहे.

दरम्यान, या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेसाठी अयोध्येतील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे अयोध्येला सध्या छावणीचे स्वरुप आलं आहे. त्येक कानाकोपऱ्यावर नजर ठेवता यावी म्हणून १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT