Dr. Ramvilas Vedanti Passes Away Saam tv
देश विदेश

राम मंदिर आंदोलनाचा मुख्य चेहरा काळाच्या पडद्याआड; रामविलास वेदांती यांचं निधन

Dr. Ramvilas Vedanti Passes Away: राम मंदिर आंदोलनाचा मुख्य सूत्रधार रामविलास वेदांती हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या निधनाने राम भक्तांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

राम मंदिर आंदोलनाचे प्रमुख सूत्रधार अयोध्याचे माजी खासदार डॉ. रामविलास दास वेदांती यांचं सोमवारी सकाळी निधन झालं. त्यांनी मध्य प्रदेशमध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने अयोध्या, संत मंडळी आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

डॉ. रामविलास दास वेदांती १० डिसेंबर रोजी दिल्लीहून मध्य प्रदेशच्या रीवा येथे पोहोचले होते. त्या ठिकाणी त्यांची रामकथा सुरु होती. या कथेदरम्यान त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. वेदांती हे राम जन्मभूमी आंदोलनातील प्रमुख नेते म्हणून गणले जायचे. त्यांनी आंदोलनाची भूमिका कारसेवकांपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका निभावली. अयोध्या येथील खासदार असताना त्यांनी मतदारसंघातील रस्त्यापासून राम मंदिर निर्माणाविषयी आवाज उचलला. त्यांच्या निधनाने संत मंडळी आणि राम भक्तांना मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'एक्स'वर लिहिलं की, श्री राम जन्मभूमी आंदोलनातील प्रमुख नेते, माजी खासदार, संत डॉ. रामविलास वेदांती यांच्या निधनाने अध्यात्मिक आणि सनातन संस्कृतीचं मोठं नुकसान झालं आहे. ते आयुष्यभर धर्म, समाज आणि राष्ट्रासाठी सेवा करण्यासाठी झटले. त्यांचे भक्त आणि शिष्यांना दु:ख सहन करण्याचं बळ मिळो'.

उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि बृजेश पाठक यांच्यासहित बड्या नेत्यांनी वेदांती यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. त्यांच्या निधनानंतर अयोध्या येथील त्यांच्या घराबाहेर लोकांची एकच गर्दी झाली आहे. वेदांती यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT