Ayodhya Ram Mandir Inauguration Invitation Card Saam Tv
देश विदेश

Ram Mandir Inauguration: कशी असेल अयोध्येची निमंत्रण पत्रिका? समोर आली पहिली झलक; पाहा VIDEO

Ayodhya Ram Mandir Inauguration Invitation Card: भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी होणार आहे. याबाबत भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अनेकांना आमंत्रित केले आहे.

Satish Kengar

Ayodhya Ram Temple Invitation Card:

भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी होणार आहे. याबाबत भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अनेकांना आमंत्रित केले आहे. यादरम्यान निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर आली आहे.

राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवले जात आहे. ही निमंत्रण पत्रिका एका कपड्याच्या आत ठवलेली आहे. यावर श्री राम मंदिर अयोध्या, असं लिहिलेलं आहे. रामनगरीची मातीही या निमंत्रण पत्रिकेसोबत पाठवण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निमंत्रण पत्रिकेसोबत एक बॉक्स पाठवण्यात आला आहे, जो उघडल्यावर लक्ष्मण, सीता आणि हनुमानजी यांच्यासोबत भगवान श्री राम यांचा सुंदर फोटो दिसतो. बॉक्समध्ये नाण्यासोबत चौपई लिहिलेली पट्टी पाठवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

चार हजार संतांना पाठवण्यात आले निमंत्रण

दरम्यान, रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुमारे चार हजार संतांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. सर्व परंपरेतील संत उत्सवात सहभागी व्हावेत यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे. याशिवाय सर्व शंकराचार्य, महामंडलेश्वर, शीख आणि बौद्ध पंथातील सर्वोच्च संतांनाही पाचारण करण्यात आले आहे.

कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आलं निमंत्रण

ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यासोबतच 1984 ते 1992 या काळात सक्रिय असलेल्या पत्रकारांनाही बोलावण्यात आले आहे. दरम्यान, 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. गणेशवर शास्त्री द्रविड आणि काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित पूजा करतील. प्राणप्रतिष्ठा पूजा झाल्यावर 48 दिवस मंडळ पूजा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT