Rakshabandhan 2023 Muhurat (time) Saam tv
देश विदेश

Raksha Bandhan 2023 Muhurat: रक्षाबंधनाचा मुहूर्त नेमका कधी?; रामजन्मभूमीचे आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली महत्वाची माहिती

Acharya Satyendra Das On Raksha Bandhan: यावर्षी येत्या ३० ऑगस्टला म्हणजे बुधवारी सगळीकडे रक्षाबंधन सण (Raksha Bandhan 2023) साजरा केला जाणार आहे.

Priya More

Raksha Bandhan Muhurt 2023 Marathi:

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक आणि अतुट नात्याला समर्पित असणारा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). या सणाची प्रत्येक बहीण आणि भाऊ आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी येत्या ३० ऑगस्टला म्हणजे बुधवारी सगळीकडे रक्षाबंधन सण (Raksha Bandhan 2023) साजरा केला जाणार आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. पण रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला कधी राखी बांधावी? म्हणजेच राखी बांधण्याचा मुहूर्त कधी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत रामजन्मभूमीचे आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी दिली महत्वाची माहिती दिली आहे.

रक्षाबंधनासंदर्भात रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, 'रक्षाबंधन ३० ऑगस्टला रात्री ८:०४ वाजता सुरू होईल आणि त्याच तारखेला रात्री ११:३६ वाजता संपेल. या वेळेतच रक्षाबंधन साजरे केले पाहिजे. रक्षाबंधनाला दिवसा 'मुहूर्त' नसतो.' त्यामुळे यावर्षी तुम्ही रात्री आठनंतर भावाच्या मनगटावर राखी बांधून हा सण साजरा करु शकता.

रक्षाबंधन सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाला दिर्घ आयुष्य आणि सुख मिळावे यासाठी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे भाऊ देखील आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेत असतो. त्याचप्रमाणे या सणानिमित्त प्रत्येक भाऊ आणि बहीण एकमेकांना शुभेच्छा देत आनंदात हा सण साजरा करतात.

तसंच, या वेळी पौर्णिमा तिथी ३० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.५८ वाजता सुरू होईल आणि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०५ वाजता समाप्त होईल. तर भद्रा देखील ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.५८ वाजता सुरू होईल आणि रात्री ९.१५ वाजता संपेल. भद्राच्या सावलीमुळे ३० ऑगस्टला दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त नाही. त्यामुळे संध्याकाळीच राखी बांधता येईल असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atharva Sudame: कोण काय करतो ते बघूया...; अथर्व सुदामेला असिम सरोदेंचा सपोर्ट, राज ठाकरेंना थेट फोन लावला...

Mumbai Traffic: गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीत मोठा बदल; अशी असणार मुंबई-पुण्याची वाहतूक व्यवस्था

Maharashtra Live News Update: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मित्रावर फसवणुकीचा गुन्हा

Maratha Aarakshan: मराठ्यांना आरक्षण मिळणार? आशिष शेलार यांनी स्पष्ट केली भाजपची भूमिका! म्हणाले...,VIDEO

Rohini Khadse : रोहिणी खडसेही अडचणीत? खेवलकरच्या मोबाइलचा व्हॉट्सअ‍ॅप डेटा डिलिट, पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT