Jagdeep Dhankhad. SaamTv
देश विदेश

Jagdeep Dhankhad News : सभापती जगदीप धनखड यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव? इंडिया आघाडीचा गंभीर आरोप, काय आहे प्रकरण | Marathi News

India Alliance : राज्यसभेत हिवाळी अधिवेशन सुरू असून आज दिवसभरात झालेल्या गोंधळानंतर इंडिया आघाडी आणि मित्र पक्षांकडून सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात मोठं पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे.

Saam Tv

विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं जात नाही, असा आरोप करत इंडिया आघाडीकडून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रस्तावावर आत्तापर्यंत काही खासदारांनी सह्या केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेससह टीएमसी, आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्या असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बऱ्याचवेळा गोंधळ झालेला बघायला मिळत आहे. याच गदारोळावरून आता सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडी आणि इतर मित्र पक्ष अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. सभापती म्हणून धनखड पक्षपात करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. धनखड विरोधीपक्षाच्या खासदारांकडे दुर्लक्ष करतात. बोलण्याची संधी देत नाही, असा त्यांचा आरोप आहे.

राज्यसभेत, भाजपने सोमवारी (दि.९) काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांवर देशाला अस्थिर करण्यासाठी अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप केला. यावेळी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. या गोंधळामुळे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड दुःखी झाले आणि त्यांनी मन दुखावल्याचेही म्हटले आहे.

तीन वेळा कामकाज तहकूब

राज्यसभेचे कामकाज सोमवारी दिवसभरात तीन वेळा तहकूब करण्यात आलं. त्यानंतर दुपारी ३ वाजता हे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आलं. यावेळी सभापती धनखड यांनी त्यांच्या दालनात सभागृहनेते तसंच विरोधी पक्षनेते यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती सदस्यांना दिली. सभागृह नेते जेपी नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत त्यांची ही बैठक झाली.

यानंतर त्यांनी सर्व सदस्यांना अखंडता प्राधान्याने राखता येण्यासाठी संविधानाच्या शपथेचा काळजीपूर्वक विचार करण्याचे आवाहन केले. दरम्यान, मंगळवारी (दि.१०) सकाळी सभापती जगदीप धनखड यांच्या चेंबरमध्ये ही बैठक पार पडणार आहे. मात्र, विरोधकांनी सभापती धनखड यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आणलाच तर सत्ताधारी पक्ष अशा प्रकारच्या प्रस्तावावर काय भूमिका घेईल हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi language : मराठीची सक्ती लादू नका, शिंदेंसेनेच्या नेत्याचं सरनाईकांना पत्र, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

Siddheshwar Express : सिद्धेश्वर एक्सप्रेसवर दरोडा; RPF ने उधळवला डाव, ९ महिलांना बेड्या

Vastu Tips: घरातील या चुका गरिबीचं मोठं कारण ठरू शकतात, देवी लक्ष्मी होईल नाराज

Pune Accident : कात्रज घाटात एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, ३ जखमी

SCROLL FOR NEXT