Farmers Protest : शेतकरी आंदोलन सर्वोच्च न्यायालयात, शंभू सीमा खुली करण्याबद्दल याचिका दाखल

Petition Filed In Supreme Court : शेतकरी आंदोलनाचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं असून शंभू सीमेसह इतर सर्व सीमा खुल्या करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
Farmers Protest
Farmers Protestsaam tv
Published On

शेतकरी आंदोलनाचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं असून शंभू सीमेसह इतर सर्व सीमा खुल्या करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गौरव लुथरा यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

केंद्र सरकार, पंजाब सरकार आणि हरयाणा सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांसाठी सीमा खुल्या करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सीमा बंद करणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Farmers Protest
Farmers Protest: दिल्ली मोर्चाला पुन्हा ब्रेक! पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा, अनेक शेतकरी जखमी

आंदोलकांनी शुक्रवारी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केल्यानंतर १०१ शेतकऱ्यांच्या गटाने रविवारी पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. परंतु हरयाणाच्या सुरक्षा रक्षकांनी पंजाब सीमेवर निघालेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचे गोळे आणि वॉटर कॅननचा मारा करत त्यांना रोखलं. या सर्व घटनेत किमान नऊ शेतकरी जखमी झाल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली. यानंतर शेतकऱ्यांचा दिल्लीकडे जाणारा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला. सोमवारी पुन्हा शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.

Farmers Protest
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी काय असणार भारताची भूमिका? एस जयशंकर यांनी स्पष्टच सांगितले

पंजाबचे शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी सांगितलं की, किमान नऊ शेतकरी जखमी झाले असून त्यापैकी एकाला चंदीगडच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) मध्ये नेण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांवर सोडले अश्रुधुराचे गोळे

रविवारी दुपारी शेतकऱ्यांच्या गटाने शंभू आंदोलनस्थळावरून पायी मोर्चा पुन्हा सुरू केला. तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी सर्वप्रथम आंदोलकांना पाणी पाजले. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला, पण जेव्हा ते पुढे जाऊ लागले तेव्हा सुरक्षा रक्षकांनी अश्रुधुराचे गोळे सोडले. आंदोलकांवर वॉटर कॅननचा वापर करण्यात आला. यामुळे आंदोलकांना पांगवावे लागले. त्यानंतर काही वेळातच सरवनसिंह पंढेर यांनी रविवारी शेतकरी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे वक्तव्य केले. सोमवारी होणाऱ्या बैठकीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Farmers Protest
ना शिर्डी- ना तिरूपती, 'या' मंदिरात २५ कोटींहून अधिक रूपयांचं दान, अडीच किलो सोनं आणि..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com