Rajya Sabha Election 2026 Akhilesh Yadav Claims Bjp Leaders In Touch With Sp saam tv
देश विदेश

राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? अनेक नेते बदलणार पक्ष;बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Rajya Sabha Elections UP : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी खळबळजनक दावा केला आहे. भाजपचे अनेक आमदार समाजवादी पक्षाच्या (SP) संपर्कात असून ते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. अखिलेश यादव यांच्या या दाव्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलंय.

Bharat Jadhav

  • भाजपमधील अनेक आमदार सपा संपर्कात असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.

  • या दाव्यातील संबंधित आमदारांची नावे किंवा स्वतंत्र पुष्टी उपलब्ध झालेली नाही; त्यामुळे हा दावा म्हणूनच मांडणे योग्य आहे.

  • उत्तर प्रदेशातील 10 राज्यसभा जागांसाठी 16 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीच्याआधी मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.सत्ताधारी पक्षातील अनेक नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत.हा दावा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलाय.भाजपमधील भूकंप होण्याचा दावा करताना अखिलेश यादव म्हणाले की,सत्ताधारी भाजपमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत.मोठ्या प्रमाणात नेते आमच्या पक्षात येणार असून त्यांना कसं अॅडजस्ट करायचं, असा प्रश्न आम्हाला पडलाय,कारण आम्ही शब्द मोडणारे नाही आहोत, असं अखिलेश यादव म्हणालेत.

भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याशी आमचे संबंध खूप चांगले आहेत.उत्तर प्रदेशाच्या विकास करण्यासाठी आम्ही एक आहोत. माजी आयएएस दिव्या मित्तल यांना कोणत्या पक्षात जायचंय आहे, हे त्यांनी ठरवावं.

काँग्रेससोबत आघाडी कायम असणार

काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत कोणताही बदल होणार नाही, ही आघाडी तशीच राहणार असल्याचं अखिलेश यादव म्हणालेत. राज्यसभा निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार उभा करण्याबाबत बोलताना अखिलेश म्हणाले की, यातील गणिताची सर्वांनाच जाणीव आहे. लोकशाहीत गोष्टी आवश्यक असलेल्या संख्याबळानुसारच व्हायला हव्यात.

मागील पराभवामागची कारणे अनेकांना माहित आहेत. लोकशाहीत कोणतीही बेईमानी होऊ नये.जर भाजपने गैरप्रकार केले नसते, तर समाजवादी पक्षाचे तीन खासदार निवडून आले असते. तसेच, जुन्या चुकांचे प्रायश्चित्त करण्याची ही एक उत्तम संधी आहे, असे आपण अनेकांना सांगत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धनराज नाथवाणींची उमेदवार म्हणून निवड का करण्यात आली?

धनराज नाथवाणी यांना उमेदवारी देण्यावरही अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिलीय.यामुळे नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि पुरोगामी विचारसरणी असलेल्या व्यक्तीला राज्यसभेत पाठवण्याची संधी मिळाली आहे.अनेक पक्षांवर कॉर्पोरेट क्षेत्राचा मोठा प्रभाव असतो आणि अनेक उद्योगपती वेळोवेळी समाजासाठी योगदान देत असतात. ही बाब लक्षात घेऊन त्या क्षेत्राशी संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने उद्योग क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीला राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

तुम्हीही दिवसभर एकाच जागी बसून काम करता? आरोग्यावर होऊ शकतात 5 गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

Thursday Horoscope: या 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास; पैशांपासून कामाच्या संधीपर्यंत मिळणार मोठी खुशखबर!

Bike Tyre Pressure: कडक उन्हात बाईकच्या टायरमध्ये किती हवा असली पाहिजे?

Egg Benefits : सकाळी की संध्याकाळी? अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT