Raosaheb Khevre files independent nomination, adding a new twist to the Rahuri by-election.  Saam Tv
देश विदेश

Election: मोठी बातमी! राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर, मतदान अन् निकाल कधी?

Rajyasabha Election 2026: राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे.

Priya More
  • राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

  • एल मुरुगन यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणार पोटनिवडणूक

  • राज्यसभा पोटनिवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले

भरत मोहोळकर, मुंबई

राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून १ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. डॉ. एल. मुरुगन यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०३० पर्यंत होता. पण त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदासोबत मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता.

राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक -

- २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली

- २ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

- ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अर्जांची छाननी केली जाणार

- ५ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख

- १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान आणि मतमोजणी

- सकाळी ९ ते दुपारी ४ वाजतेपर्यंत मतदान होणार आहे

- त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता मतमोजणी होऊन निकाल लागणार

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी १३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी तळागाळातील राजकारणात परतण्याची इच्छा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या पत्राद्वारे त्यांनी पीएम मोदींना विनंती केली होती की, 'अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने मी आपणास विनंती करतो की, मला राज्यमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांमधून कार्यमुक्त करावे आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून मी माझा संपूर्ण वेळ तामिळनाडूमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी देऊ शकेल.' असे मुरुगन यांनी पत्रात लिहिले होते.

त्यांनी पुढे असे सांगितले होते की, 'मला प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत जायचे आहे, माझ्या लोकांना भेटायचे आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात पक्षाची उपस्थिती वाढवण्यासाठी मदत करायची आहे.' तसंच, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतमातेची आणि तामिळनाडूची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे.', असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Vs Virat Kohli : रोहित शर्मा-विराट कोहलीत चढाओढ; वनडे रँकिंगच्या टॉप ५ मध्ये ३ भारतीय फलंदाज

Maharashtra News Live Update: कोथरूड सुतारदऱ्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या!

NCP Merger : विलीनकरणाच्या चर्चेदरम्यान मोठा राजकीय ट्विस्ट! बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकत्र, नेमकं काय चाललंय?

Maharashtra Politics: सुषमा अंधारेंचं धनंजय मुंडेंबाबत सूचक विधान अन् सर्वांच्या भुवया उंचावल्या; भर व्यासपीठावरून नेमकं काय बोलल्या?

Fruit And Vegetable Storage Tips: फळे आणि भाज्या एकत्र ठेवाव्या की नाही?

SCROLL FOR NEXT