raju shetti news  saam tv
देश विदेश

'राज्यपालांनी पदाची अब्रू घालवली';राजू शेट्टींनी राष्ट्रपतींना पत्र लिहत केली कोश्यारी यांना पदावरून हटविण्याची मागणी

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवण्याची विनंती केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे

Raju Shetti News : शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवण्याची विनंती केली आहे. या संदर्भात एक पत्र राष्ट्रपती कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची अब्रू घालवली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर खंत व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्यामुळे राजकीय पक्षांसह अन्य संघटनांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे भगत सिंह कोश्यारी यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्याच्या पाहायला मिळत आहे.

राज्यपालांना हटविण्यासाठी मुंबई हायकोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहून राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.

Raju shetti letter

राजू शेट्टी यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राजू शेट्टी म्हणाले, 'राष्ट्रपतींना भेट मागितली होती, परंतु मिळाली नाही. राज्यपालांनी पदाची अब्रु घालवली आहे. कधी मराठी माणसाचा, सावित्रीबाई फुले यांचा अपमना केला. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त हे राज्यपाल आहेत. त्यांना महाराष्ट्रातून हटवावं अशी विनंती राष्ट्रपतींकडे केली आहे'.

'छत्रपतींचा अपमान होत असेल आणि त्यांचेयावर कारवाई होत नसेल, तर सत्ताधाऱ्यांचे शिवाजी महाराजांवर किती बेगडी प्रेम आहे हे स्पष्ट होतंय. महापुरूषांवर चिखलफेक करून त्यांची उंची कमी होणार नाही हे लक्षात घ्यायला हवं, असेही राजू शेट्टी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : - राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडल यात्रा जालन्यात दाखल

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT