Traffic Police  Saam tv
देश विदेश

उपमुख्यमंत्र्याच्या पोरानं कायदा मोडला; RTO ने पकडला, ७ हजारांना भुर्दंड!

Deputy CM's Son Fined : उपमुख्यंत्र्यांच्या मुलाच्या विरोधात वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

Deputy CM's Son Fined : राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद्र बैरवा यांच्या मुलाने वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी आरटीओकडून कारवाई करण्यात आली आहे. आरटीओने उपमुख्यंत्र्यांच्या पोराकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल केलाय. सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे, परवानगीशिवाय गाडीमध्ये बदल करणे आणि हातात मोबाइल घेऊन धोकादायक गाडी चालवल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

प्रेमचंद्र बैरवा यांच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. यामध्ये डेप्युटी सीएमचा मुलगा मित्रांसोबत कार चालवताना आणि रील काढताना दिसत आहे. त्यानंतर वाहतूक विभागाने कारवाई केली. पण उपमुख्यमंत्री प्रेमचंद्र बैरवा यांनी आपल्या मुलाचा बचाव केलाय.

व्हायरल होणाऱ्या पोराच्या व्हिडीओवर उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण -

प्रेमचंद्र बैरवा यांच्या पोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. त्यामध्ये त्यांचा मुलगा मित्रांसोबत कार चालवताना आणि रील काढताना दिसत आहे. यावर उपमुख्यमंत्री प्रेमचंद्र बैरवा यांनी स्पष्टीकरण देत मुलाचा बचाव केला. मुलाचा कोणताही दोष नाही, त्याने कोणताही नियम तोडला नाही. श्रीमंताची पोरं त्याला गाडीत बसवतात, त्याला चांगली गाडी पाहायला मिळते, असे बैरवा म्हणाले.

प्रेमचंद्र बैरवा यांच्या पोराला सात हजारांचा दंड

उपमुख्यमंत्री प्रेमचंद्र बैरवा यांचे दावे फेटाळून लावत परिवहन विभागाने सात हजारांचा दंड ठोठावल्याचं समोर आलेय. परिवहन विभागाने २८ सप्टेंबर रोजी प्रेमचंद्र बैरवा यांच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध चालान जारी केले होते. त्यांच्या मुलाला तीन वेगवेगळ्या कलमांतर्गत एकूण सात हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

5,000 रुपये पहिला दंड ठोठावण्यात आलाय, जो विनापरवाना वाहनात बदल केल्यानंतर आकारला जातो. दुसरा दंड 1,000 रुपयांचा आहे, जो गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्याबद्दल ठोठावण्यात आलाय. तिसरा दंड 1,000 रुपयांचा आहे, जो हातात मोबाईल घेऊन वाहन चालवल्याबद्दल ठोठावण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT