Rajasthan Bundi Road Accident Saam TV
देश विदेश

Accident News : देवदर्शनासाठी निघाले, पण वाटेतच काळाची झडप; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू

Satish Daud

भाविकांना घेऊन देवदर्शनाला निघालेल्या एका कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना राजस्थानच्या जयपूर शहरातील बुंदी परिसरात रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवली जात आहे. तर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अपघातग्रस्त भाविक हे मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथामिक माहिती आहे.

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त भाविक हे इको कारने खातू श्यामजींच्या दर्शनासाठी जात होते. या कारमधून ९ ते १० भाविक प्रवास करीत होते. बुंदी जयपूर रोडवर कार आली असता रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारला एका अज्ञात वाहनाने धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की इको कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत कारमधील ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य ३ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य केले.

कारला धडक देणारा अज्ञात वाहनचालक सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. महामार्गावर बसवण्यात आलेले कॅमेरे आणि टोलनाक्यांवर लावण्यात आलेले कॅमेरेही तपासले जात आहेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmednagar Firing Case : कोपरगावात भरदिवसा गोळीबार, VIDEO

Bachelor Party Destination : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय? 'या' ठिकाणी प्लान करा बॅचलर पार्टी

Congress Protest: राहुल गांधींचा अपमान सहन करणार नाही, वाचाळवीरांना लगाम घाला; काँग्रेसचं आंदोलन, भाजपला इशारा

Maharashtra News Live Updates: मी निवडणूक लढण्यावर ठाम - माजी पोलीस आयुक्त संजय पांडे

IND vs BAN 1st Test: जडेजा अन् अश्विनच्या जोडीने रचला इतिहास! मोडून काढला 15 वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT