Wife Demand Liquor And Meat Saam Tv
देश विदेश

Shocking News: दारू अन् मटण दिलं तरच नांदायला येईन; बायकोच्या विचित्र मागणीला वैतागून नवऱ्याचं टोकाचं पाऊल

Wife Demand Liquor And Meat: राजस्थानमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. बायकोने सासरी नांदायला येण्यासाठी चक्क दारू अन् मटणाची अट ठेवली आहे. यामुळे तिच्या नवऱ्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

Rohini Gudaghe

Wife Demand Liquor And Meat To Return Husband House

राजस्थानमधील (Rajasthan News) बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड पोलीस ठाण्यात पतीने पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारण बायकोनं सासरी नांदायला येण्यासाठी चक्क दारू आणि मटणाची अट ठेवली आहे. यामुळे वैतागून तिच्या नवऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने बायकोच्या कुटुंबीयांवर फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे.  (Latest Marathi News)

तिच्या नवऱ्याने पोलिसांना सांगितले की, मागील वर्षी त्याची बायको रक्षाबंधननिमित्ताने माहेरी गेली होती. तेव्हापासून ती सासरी परतलेली नाही. नेहा आणि चिराग असं या जोडप्याचं नाव आहे. जेव्हा चिरागने नेहाला सासरी परत येण्यासाठी विचारलं, तेव्हा नेहाने त्याच्यासमोर अशी विचित्र अट (Liquor And Meat) ठेवली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीडित चिरागने टीव्ही नाईन हिंदीच्या हवाल्यानुसार चिरागचे कुटुंबीय बऱ्याच दिवसांपासून त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत होते. दरम्यान, त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला नेहा जैन या मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणाऱ्या मुलीचं स्थळ (Husband Wife Dispute) सुचवलं. दोन्ही कुटुंबीय एकमेकांशी बोलले.दोन लाख रुपयांची गरज असल्याचं मुलीच्या कुटुंबीयांनी चिरागला सांगितलं.

चिरागला नेहा आवडली. त्यांचं लग्न २ लाख रूपयांच्या अटीवर निश्चित झालं होतं. त्यानंतर त्यांनी जून 2023 मध्ये लग्न केलं. पण सासरच्या घरी पोहोचताच नेहाने तिचं खरं रूप दाखवायला सुरुवात (Husband Wife Clash) केली. लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच नेहाचे वडील चिरागच्या घरी आले. लग्नानंतर घरी काही विधी पूर्ण करायचे आहेत, असं सांगून नेहाला सोबत घेवून गेले. काही दिवसांनी ती सासरी परतली. परंतु सारखी अज्ञात व्यक्तीसोबत फोनवर तासनतास बोलत असायची.

एका दिवशी नेहा दारूच्या दुकानात पोहोचली. तिने तेथून दारूची बाटली आणली आणि ती घरीच प्यायला लागली.सासरच्यांनी तिला दारू पिताना पाहिल्यानंतर नेहाने त्यांना धमकावले. तिला पुन्हा अडवलं तर ती त्यांच्याविरुद्ध पोलिसांत खोटी एफआयआर दाखल करेल, अशी धमकी (Shocking News) दिली. त्यामुळे सासरचे लोकं घाबरले. त्यानंतर नेहा रक्षाबंधनासाठी माहेरी गेली ती अद्याप परतलीच नाही.

सध्या कुशलगड पोलिसांनी चिरागच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाची (Wife Demand Liquor And Meat) चौकशी करण्यात येत आहे. नेहा आणि तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT